Career After 12th : शिक्षक बनण्यासाठी ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याची आता गरज नाही! बारावीनंतर करा हा कोर्स, प्रोसेस काय?

Career Option : तुम्हाला बारावीनंतर शिक्षक बनायचे असेल तर ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याची गरज आता भासणार नाही.
Career After 12th
Career After 12thSaam Tv
Published On

How To Choose Career After 12th :

बारावी झाल्यानंतर अनेकांना आपल्या करिअरची चिंता वाटू लागते. पुढे काय करायचे हा प्रश्न देखील अनेकांना पडतो. करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असल्यातरी त्या निवडताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

परंतु, जर तुम्हाला बारावीनंतर शिक्षक बनायचे असेल तर ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याची गरज आता भासणार नाही. त्यासाठी तुमची बारावी पूर्ण झालेली असायला हवी. शाळेत शिक्षक (School) बनण्यासाठी तुमच्याकडे तीन मार्ग आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यामध्ये तुम्ही २ वर्षांचा डी.एल.एड म्हणजे बारावी, ४ वर्षांचा ITEP आणि पदवीनंतर २ वर्षांचा बी.एड. करावा लागेल. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत अनेक नवीन अभ्यासक्रमांवर भर दिला जात आहे. यामध्ये ITEP म्हणजेच एकात्मिक शिक्षक (Teacher) शिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला, ज्या अंतर्गत आपल्याला स्वतंत्रपणे पदवी घेण्याची गरज नाही. यामध्ये ग्रॅज्युएशन (Graduation) किंवा बी.एड करावे लागेल. (Education Tips In Marathi)

Career After 12th
UPSC Career Tips : UPSC मध्ये अपयश आले? चिंता कशाला हे पर्याय ठरतील बेस्ट !

नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन ज्या संस्थेने देशातील अध्यापन अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे. बारावीनंतर D.EI.Ed केल्यानंतर तुम्ही प्राथमिक वर्गाचे शिक्षक होऊ शकता. तर माध्यमिक वर्गांसाठी तुमच्याकडे B.Ed किंवा ITEP पदवी असणे गरजे आहे.

जर तुम्हालाही शिक्षक बनायचे असेल तर बारावीनंतर ४ वर्षांचा BEd कोर्स तुम्ही करु शकता. तसेच या क्षेत्रात तुम्हाला अधिक नफा देखील होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com