UPSC Career Option : 'यूपीएससी' ही आपल्या देशातील सर्वात मोठी कठीण परीक्षा आहे. दरवर्षी हजारोंच्या घरातील परीक्षार्थी ही परीक्षा देतात, परंतु या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्याार्थ्यांची संख्या फक्त 25 टक्केच आहे.
या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी अनेकजण अधिक मेहनत घेतात, पण फक्त काहींच्याच मेहनतीचे चीज झालेले पाहायला मिळते. इतकी मेहनत घेऊन देखील अनेक जणांना या परीक्षेत उत्तीर्ण होता येत नाही. काहीजण एका मागोमाग एक असे प्रयत्न करत राहातात. काहींना यश (Success) मिळते तर काही हताश होतात.
जर तुम्ही देखील 'यूपीएससी' (UPSC) परीक्षा देण्याचा विचार करत असाल तर मी परीक्षेत नापास झालो तर काय होईल? मी यूपीएससीच्या मूलाखतीत नापास झाले तर काय होईल? मला दुसरे कोणते पर्याय उपलब्ध राहातील का?" असे प्रश्न पडत असतील तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखात देणात आलेली आहेत. त्याचबरोबर 'यूपीएससी' परीक्षेसाठी तयारी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे? याचे देखील मार्गदर्शन करण्यात आले आहे.
1. दुसरा पर्याय असणे आवश्यक
एका पेक्षा आधिक वेळा 'यूपाएससी' परीक्षा देणाऱ्या अनेक परीक्षार्थ्यांनो तुमच्याकडे बॅकअप प्लॅन असणे फार महत्त्वाचे असते असे सांगितले. ही परीक्षा सर्वात मोठी व कठीण असते त्यामुळे ती उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल याची खात्री नसते. अशा वेळी तुमच्याकडे बँकअप प्लॅन तयार असल्या नुकसान होत नाही. बॅकअप प्लान (Plan) तयार असेल तर तुम्हाला होणाऱ्या नुकसानापासून सुरक्षितता मिळते. जेव्हा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडत नाहीत तेव्हा तुमच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध असणे आवश्यक असते. हा पर्याय तुम्ही तुमच्या आवडी आणि छंदांतून निवडू शकता. ज्यावर तुम्ही नंतर अवलंबून राहू शकता. फक्त यशच नव्हे अपयशालाही बँकअप प्लॅन असणे कायमच फायद्याचे ठरते.
2. राजकारण
यूपीएससी परीक्षेसाठी तुमचा प्रयत्न हे स्पष्टपणे सिद्ध करतो की तुमचे ध्येय जनतेच्या आणि समाजाच्या भल्यासाठी आहे. तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकला नाही हे कारण तुम्हाला जनसेवा करण्यापासून नक्कीच थांबवू शकत नाही. त्याऐवजी तुम्ही काम करून आणि देशाच्या उणिवांमध्ये योगदान देऊन आयएएसची तयारी करू शकता. तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाच्या आधारावर तुम्ही एखाद्या समस्येबद्दल अधिक चांगला निर्णय घेऊ शकता.
3. NGO
एनजीओ तयार केल्याने तुमचा नागरी सेवेकडे मार्ग मोकळा होतो कारण, यूपीएससी विद्यार्थांना केव्हा, कुठे काय महत्वाचे आहे हे व्यवस्थित कळते. स्वयंसेवक गोळा करून तुम्ही प्रथम छोट्या प्रमाणावर प्रकल्प सुरू करून, आपला एनजीओ ड्राईव्ह वाढवणे आणि एकदा तो वाढल्यास आपला एनजीएओ राज्य ते राष्ट्रीय स्तरापर्यंत स्पेक्ट्रम विस्तृत करणे यासाठी लागणारी बौधिक पातळी 'यूपीएससी' परीक्षार्थांमध्ये आढळून येते. त्याच बरोबर या क्षेत्रात खूप वाव असून स्पर्धा कमी आहे.
4. पत्रकारिता आणि माध्यमे
यूपीएससी परीक्षेत नापास झाल्यास तुमच्याकडे आणखी एक उत्तम पर्याय असतो तो म्हणजे पत्रकारिता. सध्या इंटरनेटचा होणारा वाढता वापर यामुळे लोकांचा बातम्या आणि पारंपारिक माध्यमांकडे कल वाढताना दिसून येतोय. यातील काही अगदीच पक्षपाती व दिशाभूल करणारी आहेत तर काही बदल घडवणारी. पण तुम्ही या क्षेत्रात चालू घडामोडीं आणि प्रणाली कशी कार्य करते हे जाणून घेऊन आपले स्थान निर्माण करू शकता.
5. पुढील शिक्षण
साधारणतः यूपीएससी परीक्षा देण्यासाठी तुम्हाला गरजेची असते ती डिग्री. त्यामुळे ज्यांनी देखील ही परीक्षा दिली असेल ते पदवीधर असतात. त्यामुळे तुम्ही परीक्षेनंतर तुमचे शिक्षण पूर्ण करू शकता किंवा तुमच्या आवडी आणि पात्रतेत बसणारा एखादा शॉर्ट टर्म कोर्स देखील करू शकता. तुम्ही पुढे MBA एन्ट्रस परीक्षा देऊ शकता. त्याचबरोबर, MSc, MTech, Mcom इत्यादी कोर्स करू शकता.
6. बँक PO
यूपीएससी परीक्षेच्या अभ्यासक्रमात बँक पीओच्या एन्ट्रस परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा बराच भाग समाविष्ट असतो. त्याचबरोबर यूपीएससी परीक्षेच्या तयारीतील ज्ञान तुम्हाला याच क्षेत्रातील सरकारी नोकरीसाठी देखील कामी येते. तुम्ही तुमच्या ज्ञानाने आयएएससाठी देखील तयारी करू शकता.
7. GATE परीक्षा
यूपाएससी परीक्षेत नापास झालेला विद्यार्थी GATE परीक्षा देऊन M.tech करू शकता आणि PSU मध्ये सामील होऊ शकता.
8. उद्योजकता
उद्योजक होण्यासाठी कोणतयाही विशिष्ट पात्रतेची गरज नसते. तुम्हाला कोणत्या प्रकारचे उद्योजक व्हायचे आहे या संबंधीत या क्षेत्रात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कोणतीही प्रवेश परीक्षा तुम्हाला तुमचे स्वतःचे काम करण्यापासून आणि परोपकारी बनवण्यापासून रोखू शकत नाही.
9. इतर पर्याय
जे विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले नाहीत ते, CSE पेपर, SSC CGL, राज्य PSC परीक्षा, अध्यापन (TET), बँकिंग परीक्षा इत्यादी सरकारी नोकरी परीक्षांना बसू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.