Career In Fashion Designing : फॅशन सेन्सचे उत्तम नॉलेज आहे ? कसे बनवाल फॅशन डिजाइनिंगमध्ये करिअर? शिक्षणाची अट किती ? जाणून घ्या सविस्तर

Career Tips : दहावी बारावीचा निकाल लागण्यापूर्वी आपल्याला वेध लागलेले असतात करिअरमध्ये पुढे काय करायचे ? करिअर कसे निवडायचे ?
Career In Fashion Designing
Career In Fashion DesigningSaam Tv

Jobs In Fashion Designing : दहावी बारावीचा निकाल लागण्यापूर्वी आपल्याला वेध लागलेले असतात करिअरमध्ये पुढे काय करायचे ? करिअर कसे निवडायचे ? आपल्यापैकी अनेकांना सोशल मीडियावर अभिनेत्रीचा फॅशन सेन्स पाहून वाटते की, आपण देखील असे काही डिजाइन करायला हवे की, ज्यामुळे आपल्या करिअरच्या अनेक नव्या संधी मिळतील.

परंतु, बरेचदा फॅशन सेन्स उत्तम असेल पण करिअर (Career) कसे निवडावे? शिक्षण किती असायला हवे ? याबाबत आपल्या कोणतीच माहीती नसते. त्यामुळे फॅशन (Fashion) डिझाइनिंगमध्ये करिअर करायचे असेल तर काय करायला हवे हे जाणून घेऊया सविस्तर

Career In Fashion Designing
Career After 10th : तंत्रज्ञान क्षेत्रात करिअरची संधी ! दहावीनंतर करा Web Developer चा कोर्स, घरबसल्या मिळेल लाखोंचा पगार

फॅशन डिझाइनिंगमध्ये करिअर सुरु करण्यापूर्वी मुलभूत डिझाइन डिप्लोमा किंवा पदवी कार्यक्रम घेणे आवश्‍यक आहे ज्यामुळे तुम्हाला नवीन ट्रेंडचा अभ्यास करण्यात मदत होईल.

1. फॅशन डिझायनर

अनेकदा आपण सिलिब्रेटींचा फॅशन डिझायनरची नावे ऐकतो यामध्ये वरूण बहल, मनीष मल्होत्रा, सब्यसाची, रोहित बल इत्यादी शीर्ष भारतीय फॅशन डिझायनर्सबद्दल नक्कीच ऐकले असेल. त्यांनी बॉलीवूडमधील फॅशन ट्रेंड (Trend) पूर्णपणे बदलून टाकला आहे.

2. शिक्षण किती हवे ?

  • 12वी नंतर तुम्ही फॅशन डिझायनिंग कोर्स करू शकता.

  • फॅशन डिझाईन/फॅशन टेक्नॉलॉजी/टेक्सटाईल डिझाईन किंवा संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा किंवा पदवी असणे अनिवार्य आहे.

  • 12वी नंतर फॅशन डिझायनर होण्यासाठी NID परीक्षा/UCEED/CEED/NIFT प्रवेश परीक्षा द्यावी लागेल.

  • यासोबतच तुम्ही खासगी कॉलेजमधून सर्टिफिकेट कोर्सही करू शकता.

  • दुसरीकडे, पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमासाठी, मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा इतर कोणतीही शिक्षणाची पात्रता असणे आवश्यक आहे.

Career In Fashion Designing
Career As Chef : चमचमीत पदार्थ बनवायला आवडतात ? शेफ बनण्याची इच्छा आहे ? कसे निवडाल करिअर ? शिक्षणाची अट, पगार किती ?

3. कोणत्या क्षेत्रात नोकरीची संधी

  • फॅशन स्टायलिस्ट

  • टेक्सटाईल डिझायनर

  • टेक्सटाईल डिझायनर

  • पर्सनल शॉपर मेकअप आर्टिस्ट

  • फॅशन मॉडेलिस्ट म्हणून नोकरी करता येईल.

Career In Fashion Designing
Maadhavi Nemkar Photo : कधी संस्कारी सून, तर कधी बोल्ड ब्युटी; माधवी तु इतकी सुंदर कशी

4. कॉलेज

  • भारतातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) हा अभ्यासक्रम मोठ्या प्रमाणावर देते.

  • आठवीनंतर तुम्ही हा कोर्स सहज करू शकता.

  • सरकारी महाविद्यालयांसह अनेक खाजगी महाविद्यालये हा अभ्यासक्रम देतात. तुम्ही तुमच्यानुसार कोर्स निवडू शकता

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com