Career Opportunity : अवघ्या काही दिवसांतच दहावीचा निकाल लागेल. अशातच मुलांनी पुढे काय करावे ? हा प्रश्न पालकांना व मुलांना सध्या सतावत असेलच. हल्ली बरेच पालक मुलांनी कोणत्या क्षेत्रात करिअर करायला हवे यासाठी करिअर कॉन्सिलरची मदत घेतात.
मुलांना वेगळ्या करिअर (Career) क्षेत्रात शिकण्याची इच्छा असते तर पालकांना वेगळ्या क्षेत्रात मुलांना शिकवण्याची इच्छा असते. तंत्रज्ञान व इंटरनेटमुळे माणसाचे आयुष्य अधिक सुलभ झाले आहे. यामुळे तो हवे त्या ठिकाणी हवी तशी गोष्ट करु शकतो. जर तुमच्या मुलांला इंटरनेटच व तंत्रज्ञानाच अधिक ज्ञान असेल तर तो Web Developer च्या क्षेत्रात करिअर करु शकतो. हा कोर्स काय आहे ? शिक्षणाची अट ? याविषयी सविस्तर जाणून घेऊया
1. वेब डेव्हलपमेंट म्हणजे काय ?
डिजिटल (Digital) युगाच्या वाढत्या गोष्टींमुळे वेबसाइट्स ही आजच्या तरुणाईची गरज बनली आहे. सरकारी संस्था, खाजगी कंपन्या, शाळा, महाविद्यालये, अगदी लोकही आता त्यांच्या वैयक्तिक वेबसाइट मोठ्या संख्येने बनवत आहे. यामुळे कामाच्या अनेक नव्या संधी देखील उपलब्ध झाल्या आहेत. तसेच या शिक्षणाला अधिक स्कोप देखील आहे. जर तुम्हाला संगणक क्षेत्रात रस असेल तर तुम्ही वेब डेव्हलपमेंटमध्ये करिअर करू शकता. यामधून तुम्ही स्वत:चा व्यवसाय देखील करु शकतात.
2. काम काय असते ?
वेब डेव्हलपरचे काम म्हणजे वेबसाइट तयार करणे, ती सर्व्हरशी जोडणे, त्याची देखभाल करणे. हे लोक नंतर कंटेंट पोस्टिंगचे कामही करतात. तर यात बरेचदा सोशल मीडिया मॅनेजमेंटचे कामही करतात.
3. शिक्षण क्षेत्र
आयटीआय
डिप्लोमा
बीसीए
बीएससी-आयटी
B.Tech-IT
हा कोर्स सहा महिने ते एक वर्षाचा असतो. जर तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल आणि तुमचा व्यवसाय करायचा असेल तर हे सर्वात चांगले माध्यम आहे. आयटीआय आणि डिप्लोमा हे साधारणपणे दोन वर्षांचे आणि तीन वर्षांचे अभ्यासक्रम असतात.
4. बारावीनंतर या क्षेत्रात करिअर कसे कराल ?
तुम्ही लॅटरल एन्ट्रीद्वारे प्रवेश घेऊन हा वेळ कमी करू शकता. बीसीए, बीएससी तीन वर्षांचा आणि बीटेक चार वर्षांचा अभ्यासक्रम आहे. हे तीन कोर्स करण्याचा फायदा म्हणजे तुम्हाला सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये नोकरी मिळू शकते. कारण नोकरीसाठी ज्ञानासोबत पदवी आवश्यक असते. बीसीए, बीएससी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आजूबाजूला कॉलेज पाहू शकता कारण हे कॉमन कोर्स आहेत. B.Tech साठी जेईई-मेन द्यावे लागते.
5. पगार (Salary)
वेब डेव्हलपरचा सुरुवातीला पगार सुमारे 1.8 लाखांपासून सुरू होतो. जस जसा तुम्हाला कामाचा अधिक अनुभव येतो तसा त्याचा पगार वाढत जातो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.