How to choose Stream After 10th : दहावी झाल्यानंतर अनेक मुलांना व पालकांना प्रश्न पडतो की, पुढे कोणत्या क्षेत्रात जायचे. उन्हाळ्याच्या सुट्टीत पालक आपल्या मुलांना अनेक प्रकारचे कोर्स करायला सांगतात. परंतु, रिजल्ट लागल्यानंतर अनेकांना प्रश्न पडतो की, कोणती स्ट्रीम चांगली आहे?
पालक सांगतात एक, मुलांना (Child) करायचे असते वेगळे, त्यात तिसरे कुणी त्यात आणखी काही वेगळेच सांगते त्यामुळे पुन्हा संभ्रम निर्माण होतो. कोणत्याही शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या मनात सर्वात मोठा प्रश्न असतो की त्यांनी 10वी नंतर कोणते स्ट्रीम (Stream) निवडायचे आर्ट्स, सायन्स की कॉमर्स या तीनपैकी एक विषय निवडण्याबाबत बहुतेक मुले संभ्रमात असतात आणि कोणता विषय निवडायचा हे शेवटपर्यत ठरवू शकत नाहीत
जो अभ्यासात चांगला असतो तोच सायन्स (Science) घेऊ शकतो असाही एक गैरसमज आहे. कॉमर्स आणि अभ्यासात कमकुवत असलेली मुलं आर्ट्स घेतात अशी सरासरी आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार विषय निवडला तरच उत्तम निकाल मिळतो. अशा परिस्थितीत, तुम्हाला कसे कळेल की तीनपैकी कोणता विषय तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे, त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Career Option after 10th)
1. सायन्स
जर तुमच्या मुलांचे गणित चांगले असेल. तंत्रज्ञान किंवा संगणक क्षेत्रात करिअर करायचे आहे. तसेच विज्ञान, वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी संबंधित कामात रस आहे. कल नैसर्गिक विज्ञानाकडे असेल. तर हमखास त्याने सायन्स निवडायला हवे.
2. कॉमर्स
बँकिंग क्षेत्रात अधिक रस असेल तसेच व्हाईट कॉलरची नोकरी हवी आहे. कोणत्याही कंपनीत मॅनेजमेंट पदावर नोकरी हवी आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. तुमचा कौटुंबिक व्यवसाय वाढवायचा आहे. तुम्ही अंकांमध्ये चांगले आहात. तुम्हाला सीए किंवा सीएस व्हायचे आहे. तर तुम्हाला कॉमर्समध्ये करिअर करण्याची उत्तम संधी आहे.
3. आर्ट्स
तुम्हाला कलाकार म्हणून करिअर करायचे आहे. किंवा चित्रीकरण, छायाचित्रण, पत्रकारिता, मानसशास्त्र किंवा इतर क्षेत्रात करिअर करायचे आहे. कला, हस्तकला, संगीत, भाषा आणि साहित्याची आवड आहे.तुम्हाला काहीतरी नवीन तयार करायचे आहे. तर तुम्ही आर्ट्समध्ये तुमचे करिअर करु शकता.
विज्ञान, वाणिज्य आणि कला यापैकी कोणताही एक विषय निवडण्यासाठी तुम्हाला कोणत्या विषयात रस आहे आणि भविष्यात तुम्हाला स्वतःला कसे पहायचे आहे हे समजून घ्यावे लागेल. निर्णय पूर्णपणे तुमचा असावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.