
यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड स्पर्धा परीक्षा आहे. सरकारी अधिकारी होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न असणार तरुण यूपीएससी परीक्षा देतात. यूपीएससी परीक्षा देताना अनेकदा अपयश येते. काही क्वचित लोक पहिल्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक करतात. परंतु अनेकांना अपयशाचा सामना करावा लागतो. परंतु कितीही वेळा अपयश आले तरी त्यावर मात करुन पुन्हा प्रयत्न करणारी व्यक्ती नक्कीच यशस्वी होते. असंच यश महाराष्ट्राच्या लेकीला मिळालं आहे. अर्पिता थुबे यांनी यूपीएससी परीक्षा २०२२ मध्ये २१४ वी रँक मिळवली. (Success Story Of IAS Officer Arpita Thube)
इंजीनियरिंगचं शिक्षण
आयएएस अधिकारी अर्पिता थुबे या मूळच्या ठाण्याच्या रहिवासी. त्या लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग केले.याच काळात त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी त्यांनी केली.
दुसऱ्या प्रयत्नात आयपीएस (UPSC Success Story)
अर्पिता यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली. यावेळी त्यात प्रिलियम्स परिक्षादेखील पास करु शकल्या नाही. परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी २०२० मघ्ये पुन्हा एकदा तयारी केली. यावेळी त्यांना यश मिळाले.त्यांनी यूपीएससी परिक्षेत ३८३ रँक मिळवत पास झाल्या. तेव्हा त्यांची IPS म्हणून नियुक्ती झाली. परंतु त्यांचे आयएएस होण्याचे स्वप्न होते. (Arpita Thube)
चौथा प्रयत्न
२०२१ मध्ये अर्पिता यांनी पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षा दिली.परंतु त्यांना पुन्हा अपयश आले. त्यामुळे त्यांनी काही काळ सुट्टी घेऊन पूर्णवेळ अभ्यास केला. मागच्या दोन वेळा केलेल्या चुका सुधारुन त्यांनी पुन्हा जिद्दीने अभ्यास केला. रात्र आणि दिवस एक करुन त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले. त्या आयएएस अधिकारी म्हणून रुजू झाल्या आहेत.
अपयश हे प्रत्येकालाच येते. परंतु या अपयशावर मात करुन जो व्यक्ती चुका सुधारतो. पुन्हा प्रयत्न करतो त्याला नक्कीच यश मिळते. अर्पित यांचा हा संघर्ष सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.