IAS Pooja Khedkar: आयएएस अधिकारी पूजा खेडकरांच्या अडचणी वाढल्या; अपंगत्वाचा दाखला नियमबाह्य

IAS Pooja Khedkar: वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर आलीय. पूजा खेडकर यांच्याकडे असलेलं अपंगत्वाचा दाखल नियमबाह्य असल्याचं म्हटलं जात आहे.
IAS Pooja Khedkar: आयएस अधिकारी पूजा खेडकरांच्या अडचणी वाढल्या; अपंगत्वाचा दाखला नियमबाह्य
IAS Pooja Khedkar
Published On

गोपाल मोटघरे, साम प्रतिनिधी

वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. खेडकर यांच्याकडे असलेलं दिव्यांगाचे प्रमाणपत्र हे नियमबाह्य असल्याचा अहवाल वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टरांनी महापालिकेच्या आयुक्तांकडे दिलाय.

पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून अपंगत्वाचा दाखला नियमबाह्य पद्धतीने दाखला घेतला होता. अपंगत्वाचा दाखला प्रकरणात वायसीएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळे यांचा फेर अहवाल पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांकडे सादर केला. डॉक्टर राजेंद्र वाबळे यांनी यासंदर्भात दोन पानी अहवाल महापालिका आयुक्तांकडे पाठवलाय.

तांत्रिक बाबी आणि शासकीय निकषाच्या आधारे पूजा खेडकर यांना अपंगत्वाचा दाखला दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मात्र वाय सी एम हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक्स आणि फिजिओथेरपीस्टला डॉक्टरांना क्लीन चीट मिळाली की नाही हे मात्र अजूनही अस्पष्ट आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त पूजा खेडकर संदर्भातील मुख्य सुधारित अहवाल दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे आता सादर करण्यात येणार आहे.

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी वायसीएम हॉस्पिटलला दिले होते. या आदेशानुसार वाय सी एम हॉस्पिटलमधील डॉक्टर हे निर्दोष असल्याची माहिती या हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळे यांनी दिली होती. संबंधित डॉक्टरांकडून पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राबद्दल अहवाल मागवला होता. त्यात त्यांनी पूजा खेडकर यांची योग्य तपासणी करून शासकीय निकषानुसार त्यांना ७ टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याचं आधी सांगण्यात आले होते.

दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे पूजा खेडकर यांना शिक्षणात किंवा शासकीय नोकरीत कोणताही लाभ घेता येत नाही, असे स्पष्टीकरण वाय सी एम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळे यांनी दिले होते. त्याचबरोबर 'पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्र घेण्यासाठी जे रेशन कार्डचा जो बनावट पत्ता सादर केल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, पूजा खेडकर यांनी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टासमोर अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलाय. यासंदर्भात आज कोर्टात सुनावणी होणार आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश देवेंद्र कुमार जंगला यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.

IAS Pooja Khedkar: आयएस अधिकारी पूजा खेडकरांच्या अडचणी वाढल्या; अपंगत्वाचा दाखला नियमबाह्य
IAS Pooja Khedkar : मोठी बातमी! पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांना दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com