IAS Pooja Khedkar : मोठी बातमी! पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांना दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

Dilip Khedkar Court Granted Bail : आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात त्यांचे वडील दिलीप खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याप्रकरणी त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती.
IAS Pooja Khedkar
IAS Pooja KhedkarSaam Digital
Published On

आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात त्यांचे वडील दिलीप खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. पुणे सत्र न्यायालयाने दिलीप खेडकरांना २५ जुलै पर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याप्रकरणी ते लाचलुचपत विभागाच्या निशाण्यावर होते, त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती.

पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. मनोरमा यांच्यानंतर दिलीप खेडकर यांच्यावर देखील अटकेची टांगती तलवार होती. मात्र, न्यायालयाने खेडकर यांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करत तात्पुरता दिलासा दिला आहे, मात्र जामीन केवळ २५ जुलैपर्यंत मंजूर करण्यात आला आहे.

वडील वरीष्ठ अधिकारी असूनही पूजा खेडकर यांनी ओबीसी कोट्यातून प्रवेश घेतला होता. दिलीप खेडकर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात अधिकारी होते. वंचित बहुजन आघाडीकडून त्यांनी नुकताच झालेली लोकसभा निवडणूक अहमदनगरमधून लढवली होती. उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रा त्यांनी ४० कोटींची मालमत्ता असल्याचं म्हटलं होतं. मात्र पूजा खेडकर यांच्यामुळे दिलीप खेडकर यांच्या अडचणी वाढल्या, यातून आता त्यांच्या मालमत्तेचीही चौकशी होणार आहे.

IAS Pooja Khedkar
UPSC on IAS Pooja Khedkar : UPSC चा मोठा निर्णय! पूजा खेडकर यांची निवड रद्द होणार? खटलाही दाखल करण्याचा निर्णय

दिलीप खेडकर आयएएस राहिले असून सेवेत असताना त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून दोनदा निलंबित करण्यात आलं होते. 2023 मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळच्या संचालकपदावरून ते निवृत्त झाले होते. यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण करत लोकसभा निवडणुकही लढवली होती. मात्र आता संपूर्ण कुटुंब गोत्यात आलं आहे. पूजा खेडकर यांच्यावर UPSC ने कटला दाखल केला आहे. तर UPSC तून निवडही रद्द होण्याची शक्यता आहे. तर मनोरमा खेडकर यांनाही अटक झाली आहे. दररोज पूजा खेडकर प्रकरण एका वेळळ्या वळणावर पोहोचत आहे.

IAS Pooja Khedkar
Mukhyamantri Ladki Bahin Yojana : सावधान! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत हॅकर्सचा सुळसुळाट; महिलांच्या बँक खात्यावरची रक्कम होतेय गायब

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com