UPSC on IAS Pooja Khedkar : UPSC चा मोठा निर्णय! पूजा खेडकर यांची निवड रद्द होणार? खटलाही दाखल करण्याचा निर्णय

FIR against IAS Puja Khedkar : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) पूजा खेडकर यांना चुकीची माहिती दिल्याबद्दल उमेदवारी रद्द का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. खोटी माहिती दिल्याप्रकरणी ख़टलाही दाखल करण्याचा निर्णय UPSC ने घेतला आहे.
UPSC on IAS Pooja Khedkar
UPSC on IAS Pooja KhedkarSaam Digital
Published On

पूजा खेडकर यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही आहेत. आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) पूजा खेडकर यांना चुकीची माहिती दिल्याबद्दल सिव्हिलची उमेदवारी रद्द का करू नये, याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसंच पूजा खेडकर यांच्या विरोधात FIR दाखल करण्याचा मोठा निर्णय UPSC ने घेतला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा-2022 मध्ये पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची तात्पुरती शिफारस केली होती. दरम्यान सध्या सुरू असलेल्या प्रकरणात पूजा खेडकर यांच्या गैरवर्तनाचा UPSC ने सखोल तपास केला आहे. या तपासात पूजा खेडकर यांनी त्यांचं नाव, तिच्या वडिलांचे आणि आईचं नाव, तिचे फोटो/स्वाक्षरी, तिचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून ओळख लपवून आयोगाची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.

त्यामुळे UPSC ने पोलीस अधिकाऱ्यांकडे FIR दाखल करून फौजदारी खटल्यासह कारवाई सुरू केली आहे. तसंच त्यांची सिव्हिलची उमेदवारी रद्द का करून नये, अशी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. सेवा परीक्षा 2022 आणि नागरी सेवा परीक्षा-2022 च्या नियमांनुसार, भविष्यातील परीक्षा आणि निवड यावरही बंदी घालण्यात आली आहे.

UPSC on IAS Pooja Khedkar
IAS Pooja Khedkar: IAS पूजा खेडकर यांच्या छळाच्या आरोपावर पुणे जिल्हाधिकाऱ्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

UPSC आपल्या घटनात्मक आदेशाचे काटेकोरपणे पालन करते. कोणतीही तडजोड न करता योग्य परिश्रमाच्या शक्यतेच्या क्रमाने सर्व परीक्षांसह सर्व प्रक्रिया पार पाडते. UPSC ने अत्यंत निष्पक्षतेने आणि नियमांचे काटेकोर पालन करून सर्व परीक्षा प्रक्रियेचे पावित्र्य आणि अखंडता सुनिश्चित केली आहे. विशेषतः उमेदवारांकडून विश्वास आणि विश्वासार्हता मिळविली आहे. त्याला कधीही तडा जाऊ दिला जाणार नाही, असं UPSC ने स्पष्टपणे नमूद केलं आहे.

पूजा खेडकर प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होतायते. गाडीवर लाल दिवा लावल्यानंतर त्यांची बदली वाशिमला करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात अनेक कारनामे समोर आले होते. त्यांनी नाव बदलून परीक्षा दिल्याचं देखील समोर आलं होतं. युपीएससी प्रशासनाला दिलेल्या दिव्यांगत्व प्रमाणपत्रावर देखील संशय व्यक्त केला जात होता. पूजा खेडकर यांच्यानंतर त्यांचे आईवडील देखील वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

UPSC on IAS Pooja Khedkar
IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरांच्या अडचणी आणखी वाढणार, आईच्या नावावर असलेली कंपनी जप्त होणार; नेमकं कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com