IAS Pooja Khedkar: IAS पूजा खेडकर यांच्या छळाच्या आरोपावर पुणे जिल्हाधिकाऱ्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Pune Collector Suhas Diwase: पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात वाशिम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये त्यांनी सुहास दिवसे यांनी माझा लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
IAS Pooja Khedkar: IAS पूजा खेडकर यांच्या छळाच्या आरोपावर पुणे जिल्हाधिकाऱ्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
IAS Pooja Khedkar And Pune Collector Suhas DiwaseSaam Tv
Published On

वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकरी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला होता. पूजा खेडकर यांच्या या आरोपावर सुहास दिवसे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पुणे एअरपोर्टवर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. 'या आरोपांवर बोलण्यासारखे असे काहीच नाही.', असे म्हणत सुहास दिवसे यांनी याप्रकरणावर बोलणं टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

IAS Pooja Khedkar: IAS पूजा खेडकर यांच्या छळाच्या आरोपावर पुणे जिल्हाधिकाऱ्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरांच्या अडचणी आणखी वाढणार, आईच्या नावावर असलेली कंपनी जप्त होणार; नेमकं कारण काय?

सुहास दिवसे यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपावरील प्रश्नावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, 'यावर प्रतिक्रिया देण्यासारखे काही नाही. मला तक्रारीची कोणतीही प्रत मिळालेली नाही. त्यामुळे माझ्याकडे बोलण्यासाठी काहीच नाही.', असे म्हणत सुहास दिवसे यांनी याप्रकरणावर उत्तर देणं टाळले आणि ते तिथून निघून गेले.

पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात वाशिम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये पूजा खेडकर यांनी सुहास दिवसे यांनी माझा लैंगिक छळ आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. पण सुहास दिवसे यांच्याविरोधात पूजा खेडकर यांनी केलेली तक्रार ही वाशिम पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे सांगत ही तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली.

IAS Pooja Khedkar: IAS पूजा खेडकर यांच्या छळाच्या आरोपावर पुणे जिल्हाधिकाऱ्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरांच्या आईला अखेर अटक, महाडमधील हॉटेलमध्ये लपून बसल्या होत्या मनोरमा खेडकर

पूजा खेडकर या खासगी कारवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह केल्यामुळे चर्चेत आल्या. त्यानंतर हे प्रकरण खेडकर यांच्या शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्र इथपर्यंत पोहोचलं. दररोज पूजा खेडकर प्रकरणात नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. नागरी सेवा परीक्षेत निवड होण्यासाठी फसवणूक केल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्यावर करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे. अशामध्ये सरकारने मंगळवारी पूजा खेडकर यांचं जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित केले. त्यांना 23 जुलैपर्यंत लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी मसुरी येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

IAS Pooja Khedkar: IAS पूजा खेडकर यांच्या छळाच्या आरोपावर पुणे जिल्हाधिकाऱ्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
IAS Officer Pooja Khedkar: जिल्हाधिकाऱ्यांकडून छळ की पूजाचा खेळ? प्रशिक्षणाला ब्रेक लागताच खेडकरांची तक्रार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com