IAS Officer Pooja Khedkar: जिल्हाधिकाऱ्यांकडून छळ की पूजाचा खेळ? प्रशिक्षणाला ब्रेक लागताच खेडकरांची तक्रार

Pooja Khedkar Allegations On Pune Collector Suhas Divate: पूजा खेडकरांच्या कारनाम्यामुळे लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीने त्यांच्या प्रशिक्षणाला ब्रेक लावलाय. त्यानंतर पूजा खेडकरांनी जिल्हाधिकाऱ्यांवर छळाचा आरोप केलाय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट पाहू या.
पूजा खेडकर
IAS Officer Pooja KhedkarSaam Tv
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही मुंबई

प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकरांचे कारनामे बाहेर आल्यानंतर लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय प्रशिक्षण अकादमीने पूजा खेडकरांच्या प्रशिक्षणाला ब्रेक लावलाय. मात्र यानंतर पूजा खेडकरांनी थेट पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनीच छळ केल्याची तक्रार पोलिसांकडे केलीय. त्यामुळे या तक्रारीची शहानिशा पुणे पोलिसांकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणी पूजा खेडकरांच्या तक्रारीभोवती संशयाची सुई फिरायला सुरुवात झालीय.

जिल्हाधिकाऱ्यांकडून छळ की पूजाचा खेळ?

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात IAS प्रशिक्षणासाठी असलेल्या पूजा खेडकर त्यांच्या वर्तनामुळे चर्चेत आल्या होत्या. त्यावरून पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी पूजा खेडकरांच्या वर्तनासंदर्भात अहवाल सरकारला पाठवला (IAS Officer Pooja Khedkar) होता.

प्रशिक्षणाला ब्रेक लागताच खेडकरांची तक्रार

पूजा खेडकरांनी अडचणीत आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोपांबाबत संशय निर्माण केला जातोय. तर दुसरीकडे पूजा खेडकरांचे कारनामे मात्र थांबायला तयार (Pooja Khedkar News) नाहीत. आता पूजा खेडकरांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतून दुसरं दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचंही समोर आलंय. त्यामुळे अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

पूजा खेडकर
IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरांच्या आईला अखेर अटक, महाडमधील हॉटेलमध्ये लपून बसल्या होत्या मनोरमा खेडकर

पूजा खेडकरांविरोधात गैरवर्तवणुकीचा अहवाल

पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पूजा खेडकरांविरोधात गैरवर्तवणुकीचा अहवाल आधीच सादर केला होता. मात्र खेडकरांचे इतर कारनामे बाहेर आल्यानंतर त्या मोठ्या अडचणीत आल्या. आता त्यांच्या प्रशिक्षणालाच ब्रेक लागल्यानं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर (Pune Collector Suhas Divate) केलेल्या छळाच्या आरोपांबाबत संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे सर्वच प्रकरणांची कसून चौकशी व्हायला हवी. एवढंच नव्हे तर दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्याची गरज आहे.

पूजा खेडकर
Pooja Khedkar News: वादग्रस्त आएएस अधिकारी पूजा खेडकरचा नवा कारनामा समोर; दिव्यांग प्रमाणपत्र घेण्यासाठी खोटा रहिवासी पत्ता!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com