Success Story: ३० लाखांची नोकरी सोडली अन् UPSC क्रॅक केली, AI इंजिनियर ते IFS ऑफिसर अंकन बोहरा यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of IFS Ankan Bohara: आयुष्यात कितीही अपयश आले तरीही जो व्यक्ती पुन्हा प्रयत्न करतो तो वयक्ती यशस्वी ठरतो. असंच काहीसं IFS अंकन बोहरा यांच्यासोबत झालं. त्यांनी खूप मेहनत करुन कोचिंगशिवाय यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा क्रॅक करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. अशीच मेहनत अंकन बोहरा यांनी केली. एआय इंजिनियर ते आयएफएस ऑफिसर हा प्रवास अंकन बोहरा यांच्यासाठी सोपा नव्हता. त्यांनी सर्वात वेगळा मार्ग निवडत यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. (IFS Ankan Bohora)

Success Story
Success Story: डॉक्टर बनायचे स्वप्न झाले भंग, सुरु केलं मॉडेलिंग, नंतर दिली UPSC; तिसऱ्या प्रयत्नात IAS झालेल्या तस्कीन खान यांची यशोगाथा

अंकन बोहरा यांनी भारतीय वन सेवा (IFS) परीक्षा १४ व्या रँक मिळवत पास केली आहे. त्यांनी आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडून यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. अंकन बोहरा यांनी बनारस युनिव्हर्सिटीमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. एका वर्षाच्या आत मी यूपीएससी परीक्षा क्रॅक करेन, असा विश्वास त्यांना होता. परंतु त्यांना सलग दोनदा अपयश आले. परंतु ते निराश झाले नाही. त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केले. (Ankan Bohara Success Story)

अंकन बोहरा यांनी आयआयटी बीएचयूमधून २०२० मध्ये इंजिनियरिंग पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सॅमसंग कंपनीत एआय इंजिनियर म्हणून काम केले. त्यांना कंपनीत ३० लाख रुपये पॅकेज होते. परंतु त्यांनी ३० लाखांची नोकरी सोडून यूपीएससी देण्याचा निर्णय घेतला.

अंकन यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्रॅक केली.परंतु मुलाखतीत बाद झाले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या प्रयत्नातही परीक्षा दिली परंतु मुलाखती क्रॅक करु शकले नाही. शेवटी ते आयएफएसमध्ये १४ वी रँक मिळवून सरकारी अधिकारी बनले. (Ankan Bohara Left High Paid Job And Crack UPSC)

Success Story
Success Story: IIT ड्रॉप आउट तरीही उभारली २८६ कोटींची कंपनी; राहुल रायचा प्रेरणादायी प्रवास

कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय केला अभ्यास

अंकन बोहरा यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय परीक्षा दिली.त्यांनी संपूर्ण अभ्यास इंटरनेटवरुन केला. ते सकाळी ५ वाजता उठून अभ्यास करायचे.ते त्यांच्या सरावावर जास्त लक्ष द्यायचे.त्यांनी मागच्या अनेक वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचा सराव केला. त्याचसोबत त्यांनी आपल्या फिटनेसवरदेखील लक्ष दिले.

Success Story
Success Story: लहानपणी वडिलांचे छत्र हपरलं, अनाश्रामात बालपण, जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS मोहम्मद शाहिब यांची यशोगाथा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com