
यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड आणि प्रतिष्ठित परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा द्यायची म्हटल्यावर अनेकदा अपयश हे येतेच. परंतु अनेकजण आपले स्वप्न जिद्दीने पूर्ण करतात. असंच काहीस आयएएस अनन्या दास यांनी केलं आहे.
अनन्या दास यांनीदोन सर्वात अवघड परीक्षा क्रॅक केल्या आहेत. जेईई आणि यूपीएससी परिक्षेत यश मिळवून त्यांनी नवीन आदर्श निर्माण केला आहे. (Success Story)
आयएएस अनन्या दास या मूळच्या ओडिशाच्या रहिवासी.त्यांचा जन्म १५ मे १९९२ रोजी झाला. त्यांचे वडिल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करायचे. अनन्या या लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्रॅक केली. अनन्या यांनी इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले त्यानंतर त्यांनी बँकेत नोकरी केली. (Success Story Of IAS Ananya Das)
आयएएस अनन्या दास यांनी आयआयटी मद्रासमध्ये (IIT Madras) अॅडमिशन घेतले.कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेकची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्समधून इकोनॉमिक्समधून एमएससी केले.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनन्या दास यांनी ओरेकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरी केली. त्यानंतर त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (Reserve Bank Of India Job) एक्झिक्युटिव्ह इंटर्न म्हणून काम केले.
आयुष्यात सर्व काही व्यवस्थित सुरु असताना अनन्या दास यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. अनन्या दास यांनी रेग्युलर ९ ते ५ नोकरी करण्याचा कंटाळा आला. त्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडली. त्यांनी यूपीएससी परिक्षेची तयारी केली. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.