Success Story: एकदा दोनदा नाही तर सलग पाचवेळा अपयश; ६ व्या प्रयत्नात UPSC क्रॅक ; प्रियंका गोयल यांची यशोगाथा

Success Story Of Priyanka Goel: कितीही अपयश आले तरीही त्यावर मात कशी करायची हे आयएएस ऑफिसर प्रियंका गोयल यांच्याकडून शिकायला हवे. त्यांनी सहाव्या प्रयत्नात यूपीएससी क्रॅक केली आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

आयुष्यात कितीही अपयश आले तरीही त्यावर मात करुन जी व्यक्ती पुन्हा प्रयत्न करते तो व्यक्ती नक्कीच यशस्वी होतो. असंच यश आयएएस प्रियंका गोएल यांना मिळालं आहे. प्रियंका गोयल या एकदा दोनदा नव्हे तर तब्बल ५ वेळा यूपीएससी परिक्षेत अपयशी ठरल्या. तरीही त्यांनी प्रयत्न सोडले नाही. शेवटच्या सहाव्या प्रयत्नात त्यांनी यश मिळाले. (IAS Success Story)

Success Story
Success Story: लहानपणी वडिलांचे छत्र हपरलं, अनाश्रामात बालपण, जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS मोहम्मद शाहिब यांची यशोगाथा

प्रियंका गोयल या मूळच्या दिल्लीच्या रहिवासी. त्यांनी पीतमपुरा येथील शाळेतून १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातील केशन महाविद्यालयातून कॉमर्समध्ये बॅचलर डिग्री प्राप्त केले. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांनी यूपीएससी परिक्षेची तयारी केली. प्रियंका गोयल यांनी ६ वेळा यूपीएससी परीक्षा दिली. त्यांनी सर्वात शेवटच्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले. त्यांनी २०२२ मध्ये २९२ गुण मिळवत यश मिळवले. (UPSC Success Story)

यूपीएससी परिक्षेच्या पहिल्या प्रयत्नात त्यांना अभ्यासक्रमाची जास्त माहिती नव्हती. त्यांनी प्रिलियम्स परिक्षादेखील उत्तीर्ण केली नव्हती. तर दुसऱ्या प्रयत्नात फक्त ०.७ गुणांनी त्या परीक्षा क्लिअर करु शकल्या नाहीत. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात पुन्हा त्यांना अपयश मिळाले. चौथ्या प्रयत्नातही अपयश मिळाले.

Success Story
Success Story: ठाण्याच्या लेकीची यशोगाथा! इंजिनियरिंग सोडली, २ वेळा UPSC क्रॅक; आधी IPS, आता IAS, वाचा

कोविडच्या काळात त्यांनी पाचव्यांदा यूपीएससी परीक्षा दिली. त्यावेळी त्यांच्या आईचे फुप्फुसे ८० टक्के निकामी झाले होते.त्यामुळे त्या प्रिलियम परीक्षा पास करु शकल्या नाहीत. या काळात त्यांच्यावर लग्नासाठी प्रेशरदेखील टाकण्यात आले होते. परंतु त्यांनी शेवटच्या प्रयत्नात जादू केली असं म्हणायला हरकत नाही. २०२२ मध्ये त्यांनी सहाव्यांदा यूपीएससी परीक्षा दिली आणि ३६९ रँक मिळवली. (Priyanka Goel Crack UPSC In 6th Attempt)

Success Story
Success Story: नोकरी करताना UPSC ची तयारी; तिसऱ्याच प्रयत्नात यश; IAS सर्जना यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com