कोलकाता येईल प्रशिक्षणार्थी लेडी डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेच्या तपासावरुन पोलिसांच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले. हे प्रकरण ताजे असताना एका आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी पोलीस तपासात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बलात्काराची तक्रार दाखल होऊनही पीडितेची वैद्यकीय तपासणी का झाली नाही, असा सवाल थेट न्यायालयात उपस्थित करण्यात आला आहे.
घटना नेमकी काय?
15 जुलैच्या रात्री कोलकाता येथे एका आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीवर सराईत गुन्हेगाराने बलात्कार केला. घरात कुणी नसल्याची पाहून आरोपी हा अधिकाऱ्याच्या घरात घुसला. बंदुकीचा धाक दाखवत त्याने पीडितेवर वारंवार बलात्कार केला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी पीडित महिलेने कोलकाता येथील लेक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.
परंतु तक्रार घेण्यासाठी पोलिसांनी विलंब केला. इतकंच नाही तर आरोपीने थेट पोलीस ठाण्यात येऊन मला धमकावण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही पीडितेने केला. गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असूनही पोलिसांनी कलमे लावण्यास हलगर्जीपणा केला, अशा आशयाचे गंभीर आरोप पीडित महिलेने केले. या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतरच पोलिसांनी आरोपीला अटक केली, असंही पीडितेचं म्हणणं आहे.
दरम्यान, या प्रकरणावर कोलकाता हायकोर्टात सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान कोर्टाने चांगलाच संताप व्यक्त केला. न्यायमूर्ती राजर्षी भारद्वाज म्हणाले, "पोलिसांनी सुरुवातीला एफआयआर योग्य प्रकारे नोंदवला नाही. तसेच गंभीर गुन्हा असूनही आरोपीवर कलमे लावली नाहीत. त्यामुळे तपासाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे".
पीडितेने जेव्हा बलात्काराची तक्रार दिली, तेव्हा तिची वैद्यकीय चाचणी का करण्यात आली नाही? पोलिसांनी घटनेचे गांभीर्य घेऊन प्रकरणाचा सखोल तपास करावा. हा तपास उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे तातडीने सोपवा, असे आदेश कोलकाता हायकोर्टाने दिले. याशिवाय, कोलकाता पोलिस आयुक्तांना लेक पोलिस ठाण्याच्या एका उपनिरीक्षक 3 महिला पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.