Pune Crime News: दबक्या पावलांनी पतीजवळ आली अन् थेट गळाच कापला; गहुंजे हत्या प्रकरणाचा २४ तासांत उलगडा

Maval Crime News: पोलिसांनी या हत्याकांडाचा २४ तासांच्या आतच छडा लावला आहे. पतीची हत्या हल्लेखोरांनी केली नसून स्वतः पत्नीनेच पतीचा गळा चिरून खून केल्याचे समोर आले आहे.
Pune Crime Maval Case Big twist Wife Ankita killed Husband Suraj Shocking Incident
Pune Crime Maval Case Big twist Wife Ankita killed Husband Suraj Shocking Incident Saam TV

Pune Crime News: पुण्याच्या मावळमधून एक भयानक घटना उघडकीस आली आहे. रविवारी मावळमधील गहुंजे येथे एका विवाहित तरुणाची अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने वार करत हत्या केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी या हत्याकांडाचा २४ तासांच्या आतच छडा लावला आहे. पतीची हत्या हल्लेखोरांनी केली नसून स्वतः पत्नीनेच पतीचा गळा चिरून खून केल्याचे समोर आले आहे. (Latest Marathi News)

अंकिता सूरज काळभोर, असे पतीचा खून केलेल्या पत्नीचे नाव असून सूरज काळभोर असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. पती अंकिताचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा. या सगळ्या गोष्टींचा अंकिताला या सगळ्या गोष्टींचा प्रचंड राग येत होता. त्या रागातूनच तिने पतीचा काटा काढल्याचं पोलीस तपासांत समोर आलं आहे.

Pune Crime Maval Case Big twist Wife Ankita killed Husband Suraj Shocking Incident
Nagpur Accident News: नागपुरात भीषण अपघात! भरधाव टिप्परने दुचाकीला उडवलं; काका-पुतणीचा जागीच मृत्यू

अंकिताने अशी केली पती सूरजची हत्या

पतीकडून दररोज होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला पत्नी अंकिता कंटाळली होती. तिने पतीला संपवण्याचा प्लान आखला. यासाठी अंकिताने रविवारी (४ जून) सकाळी पतीला माहेरी म्हणजे गहूंजेला (Pune News) न्यायचं ठरवलं. तत्पूर्वी घरातील चाकू तिने सोबत घेतला होता.

ठरल्याप्रमाणे अंकिताने पिंपरी चिंचवडच्या (Pimpari Chinchwad) आकुर्डीतील येथून गोड बोलून पतीला मावळच्या गहूंजे येथील तिच्या माहेरी नेलं. तिथे गेल्यानंतर अंकिता पतीला घेऊन शेतात गेली. दरम्यान, अंकिताने लघुशंकेला जायचा बहाणा केला. थोडं नजरेआड जाऊन तिने पतीवर नजर ठेवली.

Pune Crime Maval Case Big twist Wife Ankita killed Husband Suraj Shocking Incident
Shocking Accident: आधी कारनं उडवलं, मग ट्रकनं चिरडलं; तरीही तरुण उठून पळाला, VIDEO पाहून चक्रावून जाल

दबक्या पावलांनी आली अन् पतीचा काटा काढला

पती सूरज हा बेसावध (Crime News) असल्याची खात्री केली अन् सोबत आणलेला चाकू बाहेर काढला. दबक्या पावलाने पतीजवळ जाऊन तिने मागून चाकूने गळा चिरला आणि जमिनीवर ढकलून दिले. त्यानंतर शेतातील टिकाव आणि दगड डोक्यात घातला. यात पती सूरज याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, सूरजच्या हत्येनंतर अंकिताने बनाव रचला. चार ते पाच अज्ञातांनी अचानक हल्ला करत सूरजची हत्या केल्याचं अंकिताने पोलिसांना (Police) सांगितलं. मात्,र तिने सांगितलेल्या घटनाक्रमावर पोलिसांना संशय आला आणि उलट तपासणी करतच पत्नीचे बिंग फुटले. तळेगाव पोलिसांनी अंकिताला अटक केली आहे. पत्नीनेच पतीची हत्या केल्याचं समोर येताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com