Shocking Accident: आधी कारनं उडवलं, मग ट्रकनं चिरडलं; तरीही तरुण उठून पळाला, VIDEO पाहून चक्रावून जाल

Shocking Accident Viral Video: सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, की जो पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यावरही विश्वास बसणार नाही.
Shocking Accident Viral Video
Shocking Accident Viral VideoSaam TV

Shocking Accident Viral Video: गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात अपघातांच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. दररोज कुठे ना कुठे किरकोळ किंवा गंभीर स्वरुपाचे अपघात होत आहे. यातील बरेच अपघात वाहनांचा वेग जास्त असल्याने घडत आहेत. यातील काही अपघातांचे धडकी भरवणारे व्हिडीओ देखील समोर येत आहेत.

सोशल मीडियावर आपण व्हायरल झालेले अपघाताचे बरेच व्हिडिओ आपण बघत असतो. पण सध्या असा एक व्हिडीओ समोर आला आहे, की तो पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यावरही विश्वास बसणार नाही.  (Latest Marathi News)

Shocking Accident Viral Video
Pre Wedding Photoshoot With Kingcobra: आता तर हद्दच झाली! कपलने चक्क नागासोबत केलं प्री-वेडिंग शूट; फोटो होतायत Viral

कारण, एका तरुणाला आधी कारने उडवलं. त्यानंतर ट्रकने ठोकलं. तरीही त्याला काहीच झालं नाही. अपघातात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला. ही संपूर्ण घटना रस्त्यावरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ पाहून देव तारी त्याला कोण मारी, अशाच प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ @cctvidiots/twitter इन्स्टाग्रावरून शेअर करण्यात आला आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ (Viral Video) एका ट्रॅफिक सिग्नलवरील असल्याचं कळतंय. व्हिडीओत एक तरुण सायकल घेऊन रस्ता ओलांडत असताना अचानक भरधाव वेगात एक कार येते. काही कळण्याच्या आतच लाल रंगाची ही कार तरुणाला जोरदार धडक देते.

आश्चर्याची बाब म्हणजे ती कार अशा अँगलनं धडकली (Shocking Video) की त्या तरुणाला काहीच झालं नाही. उलट कारच कोलांडी उडी मारून रस्त्याच्या कडेला उलटली. तेवढ्यात दुसऱ्या बाजूनं एक ट्रक येऊन त्या तरुणाला धडकला. पण पुन्हा एकदा घडलं भलतंच.

तो ट्रक सुद्धा तरुणाला इजा पोहोचवू शकला नाही. उलट त्या ट्रकचेच दोन तुकडे झाले. हा अपघात पाहून अनेकांना धडकी भरली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com