Success Story: आईवडील आर्मीत ऑफिसर, लेकीने २२ व्या वर्षी क्रॅक केली UPSC; IAS चंद्रज्योती यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of IAS Chandrajyoti Singh: चंद्रज्योती सिंग यांनी वयाच्या केवळ २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी हे यश मिळवले आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस अधिकारी होण्याचे सर्वांचेच स्वप्न असते. परंतु अनेकदा यूपीएससी परीक्षेत अपयश येते. क्वचितच एखादा विद्यार्थी यूपीएससी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात क्रॅक करतो. असंच काहीसं चंद्रज्योती सिंग यांच्यासोबत झालं. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. (Success Stort Of IAS Chandrajyoti Singh)

Success Story
Success Story: मामाची इच्छा पूर्ण करण्यासाठी नोकरी सोडली अन् दिली UPSC; IPS अरीबा नोमान यांची सक्सेस स्टोरी

दरवर्षी लाखो तरुण यूपीएससी परीक्षा देतात. पहिल्याच प्रयत्नात परीक्षा क्रॅक करणारे खूप कमी लोक असतात. त्यातीलच एक म्हणजे चंद्रज्योती सिंग.

चंद्रज्योती यांचे आईवडील सैन्यात कार्यरत होते. त्यांचे वडील कर्नल दलबरा रिटायर्ड आर्मी आफिसर आहे. तर आईदेखील आर्मीत कार्यरत होत्या. चंद्रज्योती यांच्या आईवडिलांनी नेहमीच त्यांच्या शिक्षणाला पहिले प्राधान्य दिले. त्यांनी नेहमी आपल्या लेकीची साथ दिली.

आई-वडील सैन्यात असल्याने त्यांचे शिक्षण वेगवेगळ्या शहरांमध्ये झाले. त्यांना १२वी ला ९५.४ टक्के गुण मिळाले होते. त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटी मधून हिस्ट्रीमध्ये पदवी प्राप्त केली होती. ग्रॅज्युएशननंतर चंद्रज्योती यांनी १ वर्षाचा ब्रेक घेतले. त्यांनी २०१८ मध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी केली.

Success Story
Success Story: आईच्या कष्टांची किंमत आणि भावाच्या पाठिंब्याचे फळ, वसीमा बनली उपजिल्हाधिकारी

चंद्रज्योती यांनी आपल्या अभ्यासाचा प्लान तयार केला होता. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. चंद्रज्योती या २२ व्या वर्षी आयएएस अधिकारी बनल्या होत्या. त्या रोज १-२ तास पुस्तक वाचायच्या. त्यातून त्या नोट्स बनवायच्या. यामुळे त्यांना खूप फायदा झाला. खूप कमी वयात यूपीएससी क्रॅक करणाऱ्यांमध्ये चंद्रज्योती यांचे नाव आहे. (Success Story)

Success Story
Success Story: दुसर्‍याच प्रयत्नात UPSC क्रॅक, २३ व्या वर्षी IAS, स्मिता सभरवाल यांची सक्सेस स्टोरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com