Fact Check: एक्स्प्रेसवेवर नोटांचा पाऊस? ट्रकमधून नोटा पडतानाचा व्हिडिओ व्हायरल

Notes Falling From Truck On Expressway: एक्स्प्रेस वेवर एका ट्रकमधून नोटा पडत असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. एक्स्प्रेस वेवरील पैशांचा पाऊस असलेला या व्हिडीओ मागचे सत्य घ्या जाणून....
Fact Check: एक्स्प्रेसवेवर नोटांचा पाऊस? ट्रकमधून नोटा पडतानाचा व्हिडिओ व्हायरल
Notes Falling From Truck On ExpresswaySaam Tv
Published On
  • एक्स्प्रेसवेवर नोटांचा पाऊस पडत असल्याचा व्हिडिओ होतोय व्हायर

  • हा व्हिडीओ खोटा असल्याचे आले समोर

  • व्हायरल व्हिडिओ एआय एडिटेड

  • ट्रकमधून नोटा पडल्याचा दावा खोटा

संदीप चव्हाण, साम टीव्ही

एक्स्प्रेसवेवर नोटांचा पाऊस पडलाय. तसा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. पण, खरंच एक्स्प्रेस वेवर नोटांचा पाऊस पडलाय का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतोय.या व्हिडिओत पाहा, एक्स्प्रेस वेवर वेगानं जाणाऱ्या ट्रकमधून गवताच्या पेंढ्या पडतायत आणि त्यासोबतच नोटा पडत असल्याचं दिसतंय. हा व्हिडिओ एक्स्प्रेस वेवरील असल्याचा दावा करण्यात आलाय. एक्स्प्रेसवर नोटांचा पाऊस पडत असल्याने अनेकांनी प्रश्न विचारलाय की हा रस्ता नक्की कुठला आहे. त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली.

Fact Check: एक्स्प्रेसवेवर नोटांचा पाऊस? ट्रकमधून नोटा पडतानाचा व्हिडिओ व्हायरल
Fact Check: कर्मचाऱ्यांची पेन्शन ₹७५०० होणार? सरकारने स्पष्टचं सांगितलं

व्हिडिओमध्ये हा ट्रक एक्स्प्रेसवेवरून वेगानं जात असल्याचं दिसतंय. ज्यामध्ये सुके गवत आणि 500 रुपयांच्या नोटा पडतायत. समोरील कारच्या काचेवर 500 रुपयांच्या नोटा पडल्याचंही दिसतंय. पण, हा व्हिडिओ खरा आहे का? हा एक्स्प्रेस वे कुठला आहे? याची आम्ही पडताळणी सुरू केली. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नीट निरखून पाहिला. ट्रकमधून नोटांचा पाऊस कुठे पडलाय अशी बातमी कुठे आहे का? हे आम्ही तपासून पाहिलं. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

Fact Check: एक्स्प्रेसवेवर नोटांचा पाऊस? ट्रकमधून नोटा पडतानाचा व्हिडिओ व्हायरल
Fact Check : सरकार म्हणतंय, एक वेळ जेवण सोडा? खरंच अमित शाहांनी विधान केलं? VIDEO

व्हायरल व्हिडिओ पूर्णपणे खोटा आणि एडिटेड असल्याचे साम टीव्हीच्या पडताळणीतून समोर आले आहे. एआय टूल्सचा वापर करून व्हिडिओ बनवण्यात आला. ट्रकमधून कुठेही पैसे पडलेले नाहीत. दिशाभूल करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ निव्वळ मनोरंजनाच्या उद्देशाने व्हायरल करण्यात आला.अशा नोटा कुणीही टाकून देणार नाही. सध्या सगळ्यांनाच पैशांची गरज आहे...हा व्हिडिओ एआय निर्मित असून, नागरिकांनी अशा कोणत्याही खोट्या दाव्यांवर विश्वास ठेवू नये.आमच्या पडताळणीत एक्स्प्रेसवेवर नोटांचा पाऊस पडल्याचा दावा असत्य ठरलाय.

Fact Check: एक्स्प्रेसवेवर नोटांचा पाऊस? ट्रकमधून नोटा पडतानाचा व्हिडिओ व्हायरल
Fact Check : आता सर्वांना मिळणार 7500 रुपये पेंशन? सरकारकडून निवृत्तीवेतनात भरमसाठ वाढ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com