Fact Check: कर्मचाऱ्यांची पेन्शन ₹७५०० होणार? सरकारने स्पष्टचं सांगितलं

Fact Check EPS 95 Pension Hike: ईपीएफओ कर्मचाऱ्यांना पेन्शनवाढ मिळण्याबाबतचा मेसेज व्हायरल होत आहे. कर्मचाऱ्यांची पेन्शन ७५०० करण्यास मंजुरी मिळाले असल्याचे बनावट पत्र सध्या व्हायरल होत आहे.
ension Hike
ension HikeSaam Tv
Published On
Summary

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

किमान पेन्शन ७५०० होणार?

सोशल मीडियावर होतंय बनवाट पत्र व्हायरल

लाखो कर्मचाऱ्यांचे ईपीएफओ अकाउंट आहे. ईपीएफओद्वारे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन दिली जाते. दरम्यान, आता पेन्शनबाबतचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन ७५०० रुपये होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

ension Hike
EPFO 3.0 Update: EPFO कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! या दिवसापासून ATM आणि UPIमधून काढता येणार PFचे पैसे, तारीख आली समोर

कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन ७५०० रुपये व्हावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. सध्याची पेन्शन कर्मचाऱ्यांना पुरेशी नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे EPS-95 पेन्शनला मंजुरी देण्याची मागणी केली जात होती. यालाच आता मंजुरी मिळाली असल्याचा दावा करण्यात आला आहे. सोशल मीडियावर सध्या अशा आशयाचे पत्र व्हायरल होत आहे

कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन ७५०० होणार?

कर्मचाऱ्यांची पेन्शन ७५०० होणार असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे. दरम्यान, व्हायरल होणारे हे पत्र बनावट असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र डीजीपीआरद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. त्यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट करत म्हटलंय की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले, साडेसात हजार रुपयांच्या EPS-95 पेन्शनला मंजुरी मिळाल्याचा दावा करणारे पत्र बनावट आहे. यासंदर्भात कामगार मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच, #EPFO ने सोशल मीडियावर हे पत्र बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे.

ension Hike
EPFO: कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! PF च्या नियमात महत्त्वाचे बदल, थेट तुमच्यावर होणार परिणाम

यामुळेच कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवाढीबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या अफवांवर विश्वास ठेवू नका. सध्या तरी केंद्र सरकारने पेन्शन वाढीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, पेन्शन ७५०० होण्याची शक्यता फार कमी आहे.

ension Hike
EPFO कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! UPIद्वारे PF होणार ट्रान्सफर; व्हॉट्सअपवर 24x7 सेवा; लवकरच सुरु होणार सुविधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com