Rukmini Vasanth Video: प्रसिद्ध अभिनेत्रीचा बिकिनीतील 'तो' व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल; व्हिडिओचं सत्य आलं समोर

Rukmini Vasanth Video: ‘कांतारा चॅप्टर १’ फेम रुक्मिणी वसंत हिचा बिकिनी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अभिनेत्रीने हा व्हिडिओ AI द्वारे तयार केलेला बनावट व्हिडिओ असल्याचा खुलासा केला.
Rukmini Vasanth Video
Rukmini Vasanth VideoSaam Tv
Published On

Rukmini Vasanth Video: ‘कांतारा चॅप्टर १’मधील अभिनेत्री रुक्मिणी वसंत हिचा बिकिनी व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीने स्वतः पुढे येत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. रुक्मिणीने स्पष्ट शब्दांत सांगितले की, हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असून तो कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आला आहे.

गेल्या काही तासांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने शेअर केला जात होता. या व्हिडिओमध्ये हिरव्या रंगाची बिकिनी घातलेली एक तरुणी स्विमिंग पूलमध्ये उतरताना दिसत होती. तिच्या आसपास कॅमेरे आणि शूटिंगचे साहित्य घेऊन अनेक लोक आहेत. हा एखाद्या प्रोफेशनल फोटोशूट किंवा चित्रपटाचा भाग असल्याचा दिसत आहे. अनेकांनी या व्हिडिओतील तरुणी रुक्मिणी वसंत असल्याचा दावा करत ही क्लिप मोठ्या प्रमाणावर शेअर केली.

Rukmini Vasanth Video
Famous Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; डिमेन्शिया आजाराशी झुंज ठरली अपयशी, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

प्रकरण वाढत असल्याचे पाहून रुक्मिणी वसंतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले. तिने म्हटले की, “माझ्या टीमच्या आणि माझ्या निदर्शनास आले आहे की, सोशल मिडियावर माझ्या नावाने काही एआय-निर्मित (AI-generated) फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मी हे स्पष्ट करू इच्छितो की, हे फोटो आणि व्हिडिओ पूर्णपणे खोटे आणि बनावट आहेत. अशा प्रकारची फेरफार केलेली सामग्री तयार करणे आणि प्रसारित करणे हे अत्यंत बेजबाबदारपणाचे आणि प्रायव्हसीचे उल्लंघन आहे. आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेत आहोत आणि हे फोटो आणि व्हिडिओ तयार करणाऱ्या व पसरवणाऱ्यांविरुद्ध आवश्यक कायदेशीर आणि सायबर गुन्हेगारी कारवाई सुरू करत आहोत. सर्वांना विनंती आहे की, अशा प्रकारची सामग्री शेअर करणे किंवा तिच्याशी संलग्न होणे टाळावे.”

Rukmini Vasanth Video
Top 10 Actress: टॉप १० अभिनेत्रींची यादी जाहीर; भारताची नंबर १ अभिनेत्री कोण जाणून घ्या

कामाबद्दल बोलायचे झाल्यास, रुक्मिणी वसंत लवकरच 'टॉक्सिक' या बहुप्रतिक्षित चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात यश, नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी आणि तारा सुतारिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय ती ज्युनियर एनटीआर यांच्या आगामी ‘ड्रॅगन’ चित्रपटातही झळकणार आहे. हा चित्रपट ११ जून २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com