Famous Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; डिमेन्शिया आजाराशी झुंज ठरली अपयशी, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Famous Actor Death: प्रसिद्ध अभिनेते काळाच्या पडद्याआड. डिमेन्शिया आजाराशी झुंज ठरली अपयशी. मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.
British television actor Michael Keating has passes away
British television actor Michael Keating has passes awaySaam Tv
Published On

Famous Actor Death: ब्रिटिश टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते मायकल कीटिंग यांचे वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर मनोरंजन विश्वात शोककळा पसरली असून चाहते आणि सहकलाकारांकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली जात आहे. विशेषतः‘ईस्टएंडर्स’, ‘डॉक्टर हू’ आणि ‘ब्लेक्स 7’ मधील त्यांच्या भूमिकांमुळे ते प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिले.

मायकेल कीटिंग यांच्या निधनाची पुष्टी त्यांच्या एजंटने केली. ते काही काळापासून डिमेन्शियासारख्या आजाराशी झुंज देत होते. अखेर त्यांनी घरीच शांतपणे अखेरचा श्वास घेतल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यांच्या निधनानंतर ब्रिटिश मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

British television actor Michael Keating has passes away
Anupriya Goenka: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वक्तव्यानं खळबळ; वेश्याव्यवसायाला म्हटलं 'सोशल सर्व्हिस'

१९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात मायकेल यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सुरुवातीला त्यांनी अनेक मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या. मात्र त्यांना खरी लोकप्रियता मिळाली ती ‘ब्लेक्स 7’ या प्रसिद्ध साय-फाय मालिकेमुळे. या मालिकेत त्यांनी साकारलेलं ‘विला रेस्टल’ हे पात्र प्रचंड गाजलं. विशेष म्हणजे, या मालिकेच्या सर्व भागांमध्ये झळकणारे ते एकमेव कलाकार होते.

British television actor Michael Keating has passes away
Deool Band 2 Collection: बॉक्स ऑफिसवर दुमदुमला स्वामी समर्थांचा जयघोष; 'देऊळ बंद २'ची पहिल्याच दिवशी जोरदार कमाई

यानंतर त्यांनी ‘Doctor Who’ मध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. ब्रिटिश साय-फाय चाहत्यांमध्ये त्यांची विशेष क्रेझ होती. त्याचबरोबर ‘EastEnders’ मालिकेत Reverend Stevens ही भूमिका साकारत त्यांनी घराघरांत ओळख निर्माण केली. त्यांच्या सहज अभिनयशैलीमुळे ते प्रेक्षकांचे आवडते कलाकार बनले होते.

मायकेल कीटिंग यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या. काहींनी त्यांना 'उत्कृष्ट अभिनेता', तर काहींनी 'नेहमी आनंदी आणि विनोदी स्वभावाचा माणूस' अशा कमेंट केल्या आहेत. चाहत्यांनीही त्यांच्या जुन्या भूमिका आणि डॉयलॉग शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com