Shruti Vilas Kadam
ऑरमॅक्स मीडियाच्या 'टॉप १०' यादीत, बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने या वेळी 'नंबर १' चे स्थान पटकावले आहे.
ऑरमॅक्स मीडियाच्या यादीत, दक्षिण भारतीय अभिनेत्री समंथा रूथ प्रभूने दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
साई पल्लवी आणि नयनतारा यांना मागे टाकत, रश्मिका मंदान्ना चौथ्या क्रमांकावर आली आहे.
दक्षिण भारतीय अभिनेत्री काजल अग्रवाल या वेळी पाचव्या क्रमांकावर आहे. काजल ही दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री आहे.
साई पल्लवीने सहावे स्थान मिळवले आहे. साई लवकरच रणबीर कपूरसोबत रामायण या चित्रपटात दिसणार आहे. यात ती 'माता सीता' ही भूमिका साकारत आहे.
अभिनेत्री नयनतारा ऑरमॅक्स मीडियाच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे.
पुष्पा २ मधील "थप्पड मारूंगी" या गाण्याने सर्वांची मने जिंकणारी किसिक गर्ल श्रीलीला आठव्या क्रमांकावर आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कृती सॅननने या यादीत नवव्या क्रमांकावर स्थानावर आहे.
या यादीच्या शेवटी, म्हणजेच दहाव्या क्रमांकावर अभिनेत्री त्रिशा कृष्णन आहे.