Shruti Vilas Kadam
जासवंदाची फुलं आणि पाने बारीक करून तांदळाच्या पाण्यात मिसळा. हे मिश्रण केसांवर 20-30 मिनिटे लावून नंतर स्वच्छ धुवा.
जासवंदातील पोषक घटक केसांच्या मुळांना बळकट करतात, तर तांदळाचे पाणी केसांची वाढ जलद करण्यास मदत करते.
नियमित वापर केल्यास केस गळण्याचे प्रमाण कमी होते आणि केस अधिक मजबूत होतात.
तांदळाचे पाणी केसांना नैसर्गिक कंडिशनिंग देऊन मऊ आणि सिल्की बनवते.
जासवंदाचे अँटीबॅक्टेरियल गुण टाळू स्वच्छ ठेवतात आणि कोंडा कमी करतात.
या मिश्रणामुळे केसांना नैसर्गिक चमक येते आणि केस निरोगी दिसतात.
उत्तम परिणामासाठी हे मिश्रण आठवड्यातून 1-2 वेळा वापरणे फायदेशीर ठरते.