

निवृत्तीवेतनात आता भरमसाठ वाढ करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय...1 हजारवरून आता थेट 7500 रुपये...म्हणजे जवळपास सातपट वाढ करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच सरकारने असा निर्णय घेतलाय का...? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.
व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं की, कामगार आणि रोजगार मंत्रालयाने कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत EPS-95 किमान मासिक निवृत्तीवेतन थेट वाढवून 7500 रुपये केलंय'. हा मेसेज व्हायरल होतोय...त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे...पण, खरंच EPS-95 नुसार किमान मासिक निवृत्तीवेतन वाढलंय का...? आधी EPS-95 म्हणजे काय हे जाणून घेऊयात...ही EPFO द्वारे चालवली जाणारी एक सामाजिक सुरक्षा योजना आहे.
ही योजना खासगी कर्मचाऱ्यांना वयाच्या 58 व्या वर्षानंतर निवृत्तीनंतर नियमित मासिक पेन्शन प्रदान करते...या व्हायरल मेसेजमध्ये जर तथ्य असेल तर याचा अनेकांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने याची पडताळणी सुरू केली. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी EPFOची साईट तपासून पाहिली. त्यांनी काढलेलं एक नोटिफिकेशन आढळलं...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.
व्हायरल सत्य
निवृत्तीवेतन 7500 झाल्याचं पत्र पूर्णपणे बनावट
निवृत्तीवेतनधारकांनी अशा अफवांपासून सावध राहावं
सरकारी लेटरहेड,बनावट शिक्का वापरून लेटर बनवलं
EPS-95 नुसार निवृत्तीवेतन दरमहा 1 हजारच आहे
सर्व पात्र निवृत्तीवेतनधारकांना 1 मेपासून सुधारित निवृत्तीवेतन मिळण्यास सुरुवात झाल्याचा दावा केलाय...मात्र, असा कोणताही निर्णय झालेला नाही...निवृत्त झालेल्यांची दिशाभूल करण्यासाठी असं पत्र व्हायरल करण्यात आलं...त्यामुळे आमच्या पडताळणीत आता सर्वांनाच 7500 रुपये निवृत्तीवेतन मिळणार असल्याचा दावा असत्य ठरलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.