

पीएफमुळे कर्मचाऱ्यांना मिळते आर्थिक सुरक्षा
पीएफचे दोन भागात होते विभाजन
EPF आणि EPS कसे कार्य करते, जाणून घ्या
नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या पगारातून पीएफचे ठरविक पैसे कापले जातात. पीएफच्या माध्यमातून निवृत्त होईपर्यंत लाखोंचा फंड खात्यात जमा होतो. पीएफमुळे कर्माचारी निवृत्त झाल्यानंतर आर्थिक सुरक्षा मिळते. या फंडमुळे निवृत्तीनंतरचे कर्मचाऱ्यावरील आर्थिक ताण कमी होतो. याच पीएफचे दोन भाग असून EPF आणि EPSचे कॅल्क्युलेशन समजून घेऊयात.
पीएफ खरतर दोन भागांत विभागला जातो. पीएफच्या EPS च्या माध्यमातून फंड तयार होतो. यात कर्मचारी आणि कंपनीचे देखील योगदान असते. कर्मचाऱ्याला प्रत्येक वर्षी व्याज मिळते. व्याजामुळे खात्यात निवृत्तीसाठी चांगला फंड तयार होतो. सध्या EPF वर वार्षिक 8.25 टक्के व्याज मिळते. तर EPS ही कर्मचाऱ्यांसाठी खास पेन्शन योजना आहे. यात वेगळ्या माध्यमांतून फंड जमा होत नाही. तुमच्यातच पैशांतून निवृत्तीसाठी फंड तयार होतो. निवृत्त झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळावी, यासाठी व्यवस्था तयार करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनातून १२ टक्के रक्कम ही EPF मध्ये जाते. तेवढीच रक्कम कंपनी देखील देते. कंपनीचे पूर्ण पैसे EPF मध्ये जात नाहीत. परंतु कर्मचाऱ्याच्या पगारातील १२ टक्के रक्कम EPF मध्ये जाते. तर कंपनीच्या १२ टक्क्यांमधून ८.३३ टक्के इतका भाग EPS मध्ये जातो. तर उर्वरित 3.67 टक्के रक्कम EPF मध्ये जोडली जाते. EPS मध्ये कमीत कमी १२५० रुपये रक्कम निश्चित करण्यात आली आहे.
EPF ची सर्वात मोठी ताकद ही चक्रवाढ आहे. एखादा कर्मचारी ३० ते ३५ वर्ष सलग नोकरी करत असेल. ३५ वर्षांचा फंड साधारण कोटींच्या घरात पोहोचू शकतो. तुम्ही नोकरी बदलताना पीएफ काढत असाल, तर निवृत्तीचा फंड कमी होऊ शकतो.
कर्मचाऱ्यांना EPS लागू होण्यासाठी मूळ वेतन किमान १५००० रुपये असले पाहिजे. दिर्घकाळ काम करूनही बहुतांश लोकांना ८ हजार ते ९ हजार रुपये महिना पेन्शन मिळते. ही रक्कम फार कमी असल्याचे बहुतांश कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. सध्या कमीत कमी पेन्शन १००० रुपये इतकी आहे. तर ही रक्कम ३००० रुपये करण्याची चर्चा सुरू आहे.
EPS चा फायदा मिळवण्यासाठी कोणत्याही कंपनीत किमान १० वर्ष नोकरी करणे गरजेचे आहे. ५८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शन मिळते. तु्म्ही वयाच्या ५० व्या वर्षी देखील पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.