

EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
आता एटीएममधून काढता येणार पीएफ
सेवानिवृत्तीनंतरच्या पेन्शनवर परिणाम होणार का?
ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी लवकरच नवीन सुविधा सुरु करणार आहे. EPFO 3.0 लवकरच लाँच होणार आहे. यामुळे पीएफसंबंधित सर्व कामे सोपी होणार आहेत. तुम्ही पीएफचे पैसे एटीएम किंवा यूपीआयद्वारे काढू शकतात. यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. परंतु यामुळे तुमच्या सेवानिवृत्तीनंतरच्या पेन्शनवर परिणाम होऊ शकतो.
कर्मचारी आपल्या पगारातील ठरावीक रक्कम ईपीएफ खात्यात जमा करतात. त्यातील ७५ टक्के रक्कम ते काढू शकतात. दरम्यान, यामुळे तुमच्या सर्व्हिसवर परिणाण होणार आणि पेन्शनवरदेखील परिणाम होणार आहे.
EPF आणि EPSमधील फरक
एटीएममधून फक्त पीएफ काढता येणार आहे. यामध्ये कर्मचारी आणि नियोक्ता दोन्ही योगदान देतात. पीएफ काढण्याची जास्तीत जास्त मर्यादा ७५ टक्के आहे. त्यापेक्षा जास्त पैसे तुम्ही काढू शकत नाही.
पेन्शन फंड
पेन्शनमधील रक्कम ही पूर्णपणे वेगळी आहे. तुम्ही पेन्शनची रक्कम एटीएममधू काढू शकत नाही. याच कारणामुळे पेन्शनची पात्रता ईपीएफमधील जमा रक्कमेवरुन नव्हे तर ईपीएसमधील सेवेच्या कालावधीवरुन ठरवली जाते.
तज्ज्ञांचे म्हणणे काय?
कोअर इंटेग्रा येथील कंप्लायन्स ॲडव्हायझरीचे प्रमुख मुनाब अली बॅक यांच्या म्हणण्यांनुसार, पीएफमधून पैसे काढल्याने कर्मचाऱ्याच्या सेवेच्या कालावधीवर परिणाम होत नाही. यामुळे पेन्शन निधीतील योगदान किंवा पेन्शन मिळवण्याच्या पात्रतेवर परिणाम होत नाही. जर एखाद्या ५० वर्षीय कर्मचाऱ्याने पीएफचे पैसे काढले तरीही ईपीएसवर काहीही परिणाम होत नाही. कर्मचाऱ्यांनी किमान १० वर्षांची सर्व्हिस केलेली असावी. त्यांना पेन्शनचा हक्क कायम राहिल.
संपूर्ण रक्कम काढल्यावर काय होणार?
अनेकजण पीएफ खात्यातील संपूर्ण रक्कम काढतात. यामुळे त्यांच्या पेन्शनवर परिणाम होईल, असं त्यांना वाटतं. परंतु ईपीएफ आणि ईपीएस दोन्ही वेगवेगळे आहे. त्यामुळे एका खात्यातून पैसे काढल्यावर त्याचा दुसऱ्या खात्यावर परिणाम होत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.