EPFO 3.0: पीएफ विड्रॉल, UPI ते पेन्शन...; EPFO 3.0 मध्ये 'हे 'महत्त्वाचे बदल होणार

EPFO 3.0 Update PF Withdrawal UPI: कर्मचाऱ्यांसाठी लवकरच EPFO 3.0 सुविधा सुरु केली जाणार आहे. याअंतर्गत आता तुमची पीएफची सर्व कामे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
EPFO 3.0
EPFO 3.0Saam Tv
Published On
Summary

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

लवकरच सुरु होणार EPFO 3.0

पीएफची सर्व कामे ऑनलाइन होणार

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ईपीएफओ लवकरच EPFO 3.0 सर्व्हिस सुरु करणार आहे. EPFO 3.0 मध्ये सर्वकाही डिजिटल होणार आहे. तुम्हाला पीएफ काढण्यासाठी किंवा इतर कामे करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अवघ्या काही मिनिटात हे काम करु शकतात. पीएफ काढण्याची प्रोसेस खूप सोपी होणार आहे.

EPFO 3.0
EPFO: आता ATMमधून काढा PF चे पैसे; १ एप्रिलपासून बदलणार EPFO सिस्टीम; फक्त ही एकच अट

EPFO 3.0 अंतर्गत आता तुमच्या क्लेमची प्रोसेस लवकरच होणार आहे. आता तुम्ही एटीएम किंवा यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढू शकतात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना सर्वकाही डिजिटल करणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना ईपीएफओची सर्व कामे ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे.

काही दिवसात होणार पीएफ सेटलमेंट

या नवीन अपडेटमुळे सेटलमेंट खूप लवकरच होणार आहे. ईपीएफओच्या म्हणण्यांनुसार, ऑटो सेटलमेंटचा विस्तार करण्यात आला आहे. याची मर्यादा ५ लाख रुपये केली आहे. आता तुमची विड्रॉलची रिक्वेस्ट ऑटोमॅटिक पद्धतीने मान्यत केली जाणार आहे. यामुळे नियोक्त्यावर अवलंबून राहावे लागणार नाही.

UPI द्वारे पैसे काढता येणार (PF Withdrawal Through UPI)

नवीन सुविधेअंतर्गत आता तुम्ही यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढू शकतात. तुमच्या थेट बँक खात्यात पीएफचे पैसे जमा होतील. त्यानंतर तुम्ही ते यूपीआय किंवा एटीएमद्वारे काढू शकतात.तुम्ही क्लेम फाइल करणे, ट्रॅक करणे किंवा पैसे काढणे या सर्व गोष्टी मोबाईल अॅपद्वारे ट्रॅक करु शकतात.

EPFO 3.0
EPFO: आता ATMमधून काढा PF चे पैसे; १ एप्रिलपासून बदलणार EPFO सिस्टीम; फक्त ही एकच अट

युनिफाइड पेन्शन स्कीम (Unified Pension Scheme)

EPFO 3.0 अतंर्गत पेन्शन सिस्टीमला युनिफाइड केले जात आहे. आता सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि इतर सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी युनिफाइड पेन्शन सिस्टीम सर्व कार्यालयात लागू केली आहे. यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, ऑटोमेटिक आणि डिजिटल व्हेरिफिकेशनमुळे ही नवीन सुविधा बँकिंग प्लॅटफॉर्मप्रमाणे काम करेल. यामुळे कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही.

EPFO 3.0
EPFO 3.0 Update : आता बॅंकेत जायची गरज नाही, UPI द्वारे काढा PF; एकावेळी किती पैसे काढता येणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com