EPFO: आता ATMमधून काढा PF चे पैसे; १ एप्रिलपासून बदलणार EPFO सिस्टीम; फक्त ही एकच अट

EPFO PF Withdraw Through UPI And ATM: ईपीएफओ कर्मचाऱ्यांना आता यूपीआयद्वारे आणि एटीएमद्वारे पैसे काढता येणार आहे. यासाठी काही अटी आहेत. त्या अटींमध्ये तुम्ही बसत असाल तरच तुम्ही एटीएममधून पीएफ काढू शकतात.
EPFO
EPFOSaam Tv
Published On
Summary

EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

आता एटीएम किंवा यूपीआयद्वारे काढता येणार पीएफ

पीएफ काढण्यासाठी ईपीएफओने ठेवली एक अट

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. १ एप्रिलपासून ईपीएफओमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहे. ईपीएफओ एप्रिल २०२६ पासून आपल्या सिस्टीममध्ये महत्त्वाचे बदल करणार आहे. आता EPFO 3.0 अंतर्गत पीएफ काढण्याची प्रोसेस पूर्णपणे डिजिटल होणार आहे. तुम्ही अवघ्या काही मिनिटात हे काम करु शकतात. मात्र, यासाठी काही अटी आहेत. त्या अटींचे पालन केल्यावरच तुम्ही पीएफचे पैसे काढू शकतात.

EPFO
EPFO चा नवा नियम! PF ट्रान्सफर करणे झाले आणखी सोपे; या कर्मचाऱ्यांना होणार सर्वाधिक फायदा

आता कर्मचारी यूपीआय आणि एटीएममधून पीएफचे पैसे काढू शकतात.यामुळे प्रोसेस खूप सोपी होणार आहे. नवीन सिस्टीम लागू झाल्यानंतर पीएफ काढण्यासाठी खूप वेळ वाट पाहावी लागणार नाही. EPFO 3.0 अंतर्गत Instant Credit फीचरदेखील आहे. रिक्वेस्ट केल्यानंतर तुम्ही थेट यूपीआयद्वारे पैसे ट्रान्सफर करु शकतात.

एटीएममधून कसे पैसे काढायचे? (How TO Withdraw PF Through ATM Process)

तुम्हाला ईपीएफओ पोर्टल किंवा उमंग अॅपवर जायचे आहे.

यानंतर UPI withdrawal वर जायचे आहे.

यानंतर तुम्हाला अमाउंट टाकायची आहे. त्यानंतर यूपीआय पिन टाकून रिक्वेस्ट वेरिफाय करायची आहे.

यानंतर पैसे अकाउंटमध्ये आल्यावर लगेच यूपीआय सपोर्टेड एटीएमवर जाणार आहे.

यानंतर तुम्ही एटीएममध्ये क्यूआर कोड स्कॅनचा ऑप्शन दिसेल.

तुम्ही क्यूआर कोडद्वारे पैसे काढू शकतात.

यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढण्यासाठी अटी (PF Withdrawal Through UPI Rules)

ईपीएफओ ३.० अंतर्गत तुम्ही यूपीआय किंवा एटीएममधून पैसे काढू शकतात. मात्र, त्यासाठी काही अटी आहेत.तुमचा UAN (Universal Account Number) अॅक्टिव्ह असणे गरजेचे आहे. पीएफ अकाउंट आधार नंबरशी लिंक असणे गरजेचे आहे. आधार आणि यूपीआय लिंक असायला हवा. याचसोबत तुमची केवायसी झालेली असावी.

EPFO
EPFO 3.0: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता ATM आणि UPIद्वारे काढता येणार PF; सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com