EPFO चा नवा नियम! PF ट्रान्सफर करणे झाले आणखी सोपे; या कर्मचाऱ्यांना होणार सर्वाधिक फायदा

EPFO New Rule: ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता ईपीएफओ कर्मचाऱ्यांना पीएफ ट्रान्सफर करणे अधिकच सोपे झाले आहे. परदेशातील कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम जारी केले आहेत.
EPFO
EPFO Saam Tv
Published On
Summary

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

परदेशातील कर्मचाऱ्यांना पीएफ ट्रान्सफर करणे झाले आणखी सोपे

ईपीएफओने जारी केले नवे नियम

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम जारी केले आहेत. यामुळे आता परदेशात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीएफ किंवा पेन्शन ट्रान्सफर करणे खूप सोपे होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना खूप फायदा होणार आहे. ही सुविधा त्याच ठिकाणी लागू होणार जिखे भारताचीसोशल सिक्योरिटी एग्रीमेंट (SSA) आहे.

EPFO
EPFO चा ऐतिहासिक निर्णय; आता UPI द्वारे पीएफ काढता येणार?

परदेशातील कर्मचारी आता आपल्या मनाने भारतात किंवा कोणत्याही दुसऱ्या देशातील बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करु शकतात. याआधी ऑफलाइन कामांमुळे खूप उशिर व्हायचा. यामुळे कर्मचारी आणि कंपन्या दोघांनाही त्रास व्हायचा.मात्र, या नियमांमुळे काम खूप सोपे होणार आहे.

ईपीएफओने Form 15CA आणि 15CB संबंधित सर्व प्रक्रिया सोपी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम खूपच कठीण होते. यामुळे पीएफ ट्रान्सफर करताना अनेक अडचणी यायच्या.

EPFO
EPFO Update: होळीला ३१ कोटी कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; PF खात्यावरील व्याजदर वाढणार की कमी होणार? आज होणार निर्णय

आता विदेशी बँक खाते आणि बँक स्टेटमेंट किंवा पासबुकला वेरिफाय केले जाईल. दिल्लीच्या रिजनल ऑफिसमध्ये यासाठी नोडल ऑफिस असणार आहे. याचसोबत एक चार्टर्ड अकाउंटंट टॅक्ससंबंधित कामांसाठी मदत करणार आहे.

कर्मचाऱ्यांना होणार फायदा

परदेशात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नेहमी पैसे कसे ट्रान्सफर करायचे याची चिंता असते. मात्र, आता तुमचा पीएफ सहजासहजी ट्रान्सफर होणार आहे. ही प्रक्रिया कर्मचारी आणि कंपनी दोघांसाठीही खूप सोपी असणार आहे. यामुळे वेळेची बचत होणार आहे.जर कागदोपत्री काम सोपे झाले तर पुढे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी खूप कमी वेळ लागणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांसाठी ही दिलासायक बातमी आहे.

EPFO
EPFO च्या नियमांमध्ये मोठे बदल; सरकारनं दिली नवी अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com