EPFO चा ऐतिहासिक निर्णय; आता UPI द्वारे पीएफ काढता येणार?

EPFO आता पीएफचे पैसे काढण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल करणार आहे. कर्मचाऱ्यांना आर्थिक गरजांनुसार तातडीनं पीएफ काढता यावा, यासाठी EPFO नं नेमकी कोणती सुविधा सुरु केलीय ? या सुविधेमुळे कर्मचाऱ्यांना कसा फायदा होणार आहे? पाहूयात यावरचाच स्पेशल रिपोर्ट...
EPFO
EPFO Interest RateSAAM TV
Published On

आता तुमच्या हक्काच्या पीएफचे पैसे काढण्यासाठी तुम्हाला बँक आणि कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची किंवा तीन-चार दिवस वाट पाहण्याची गरज नाही. कारण EPFO आता थेट 'UPI' द्वारे पैसे काढण्याची सुविधा सुरू करतेय...गुगल पे, फोन पे किंवा पेटीएमवरून जसे आपण पैसे ट्रान्सफर करतो, अगदी तसंच आता पीएफचा निधी तुमच्या बँक खात्यात क्षणार्धात जमा होणार आहे. ही नवी सेवा कधीपासून सुरू होणार आणि पैसे कसे काढता येणार? पाहूयात...

एप्रिल 2026 पासून UPI द्वारे पीएफचे पैसे काढता येणार

तांत्रिक पडताळणीसाठी 100 डमी खात्यांची चाचणी सुरु

कर्मचाऱ्यांना 75 टक्क्यांपर्यंत निधी त्वरित काढता येणार

3 दिवसांच्या प्रक्रिये ऐवजी पैसे त्वरीत बँक खात्यात जमा होणार

EPFO
ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे निधन; अनेक पुरस्कारांचे ठरले होते मानकरी

पीएफचे पैसे आजारपण, लग्न, शिक्षण, घर दुरुस्तीसाठीच काढता येणार

पैसे काढण्यासाठी EPFO पोर्टलवर जाऊन योग्य कारण निवडा

त्यानंतर UPI आयडी टाकून पिनच्या साहाय्याने पडताळणी केली जाणार

EPFO
दिवसाढवळ्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या; गोळीबाराचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद, VIDEO

नवीन सुविधेमुळे कर्मचाऱ्यांना फक्त पैसेच काढता येणार नाहीत, तर यूपीआयच्या माध्यमातून आपले पीएफ पासबुक आणि शिल्लक रक्कमही पाहता येईल. त्यामुळे आर्थिक चणचण भासल्यास आता पीएफ फंड खऱ्या अर्थाने 'संकटमोचक' ठरणार आहे. मात्र हक्काचे पैसे मोबाईलच्या एका क्लिकवर मिळणार असताना सायबर सुरक्षेच्या दृष्टीनं पाऊल उचलणंही तितकचं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com