

ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे निधन
काकडे मुंबई प्रेस क्लबचे उपाध्यक्ष होते
त्यांनी अनेक नामांकित माध्यम संस्थांमध्ये केलंय काम
द मुंबई प्रेस क्लबचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे सोमवारी पहाटे निधन झालं. ५५ वर्षीय काकडे यांची सोमवारी पहाटे अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेताना त्यांची प्राणज्योत मालवली. राजेश यांच्या पश्चात् बंधू राजेश काकडे आणि बहीण असा परिवार आहे.
रजनीश काकडे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांची प्रकृती अचानक खालावली.त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्याआधी त्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी १ वाजताच्या सुमारास शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार रजनीश काकडे यांना मिळाले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात दैनिक सकाळमधून केली होती. पुढे ‘हिंदुस्तान टाइम्स’मध्ये तीन वर्षे काम केलं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था ‘असोसिएटेड प्रेस’मध्ये दाखल झाले. काकडे हे मागील अठरा वर्षांपासून असोसिएटेड प्रेससोबत कार्यरत होते.
काकडे हे केवळ अनुभवी छायाचित्रकार नव्हते. त्यांनी अनेक पिढ्यांतील तरुण छायाचित्र पत्रकारांना मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी अनेक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण क्षण संवेदनशीलतेने टिपले होते. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक छायाचित्रकार घडवण्याचे कामही त्यांनी केलं. ते तरुण छायाचित्रकारांना सत्याचा पाठपुरावा करण्यासाठी प्रेरित करत राहायचे. मुंबईच्या पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी अनेक माणसे घडवलीत. रजनीश काकडे यांच्या निधनामुळे माध्यम क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झालीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.