दर महिन्याला ७० लाखांहून अधिक पेन्शनधारकांना फायदा होत आहे.
CPPS प्रणालीमुळे पेन्शन वेळेवर मिळणार.
७० लाखांहून अधिक पेन्शनधारकांना फायदा.
सरकारने लोकसभेत कर्मचारी भविष्य निधी संघटनेअंतर्गत (EPFO) सुरू असलेल्या EPFO 3.0 सुधारणांविषयी सविस्तर माहिती दिली. कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी सांगितले की, या उपक्रमाचा उद्देश प्रणालीला अधिक जलद, अधिक पारदर्शक आणि वापरकर्त्यासाठी सोयीस्कर बनवणे हा आहे. यामुळे क्ले सेटलमेंट करणं अधिक जलद आणि सोपं होणार आहे.
सर्वात मोठा बदल म्हणजे केंद्रीकृत निवृत्तीवेतन प्रदान प्रणाली (CPPS) सुरू करण्यात येणार आहे. १ जानेवारी २०२५ पासून सर्व EPFO क्षेत्रीय कार्यालयांनी ही प्रणाली पूर्णपणे स्वीकारली आहे. या नव्या सिस्टीममुळे दर महिन्याला ७० लाख पेक्षा जास्त पेन्शनधारक वेळवर आपली पेन्शन मिळवू शकत आहेत. नव्या सुधरणांमुळे चुका आणि पेन्शन मिळण्यास विलंब होत नाही. क्लेम करण्यात लक्षणीय सुधारणा झाली आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, चालू आर्थिक वर्षात, २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत, ५ लाख रुपयांपर्यंतचे एकूण ३५.२ दशलक्षाहून अधिक दावे स्वयंचलित पद्धतीने निकाली काढण्यात आले आहेत.
नोकरी बदलल्यानंतर EPF अकाउंट ट्रांसफर करणं खूप सोपं झालं आहे. आधी या प्रक्रियेसाठी नियोक्त्याची मंजुरी आणि अनेक टप्प्यांची आवश्यकता होती, परंतु आता केवायसी (KYC) अपडेट केल्यावर ती आपोआप पूर्ण होते. २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अंदाजे ७.०५ दशलक्ष ऑटो-ट्रान्सफर दावे कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय प्रक्रियाबद्ध करण्यात आले आहेत. नियोक्त्याच्या मदतीशिवाय कर्मचाऱ्यांनी स्वतः सादर केलेले २१ लाखांहून अधिक नोकरी बदलीचे क्लेम मंजूर करण्यात आलेत.
EPFO ३.० हे एक डिजिटल अपग्रेड वर्जन आहे, जे कागदपत्रांचे काम कमी करते. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन व ऑटोमेटेड असते. आधी क्लेम सेटलमेंटसाठी २० दिवस लागत होते. आता तेच काम फक्त तीन दिवसात पूर्ण होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.