EPFO Calculation: तुमचा पगार ₹५०,००० आहे? रिटायरमेंटनंतर मिळतील ५.५ कोटी, कसं? कॅल्क्युलेशन वाचा

EPFO PF Retirement Fund Calculation: ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओ कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर ५.५ कोटी रुपये मिळू शकतात. यासाठी पीएफ खात्यात दर महिन्याला पैसे जमा करावे लागतील.
EPF Calculation
EPF CalculationSaam Tv
Published On
Summary

EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

सेवानिवृत्तीनंतर मिळणार ५.५ कोटी रुपये

रिटायरमेंटनंतर मिळणार चांगला परतावा

देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांचे पीएफ अकाउंट आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातील ठरावीक रक्कम जमा केली जाते. पीएफ खात्यातील ही जमा रक्कम एक प्रकारची गुंतवणूक असते. कर्मचाऱ्यांच्या पगारातील १२ टक्के रक्कम जमा केली जाते. एवढेच योगदान कंपनीदेखील देते. यामुळे भविष्यात सेवानिवृत्तीपर्यंत चांगली रक्कम जमा होते.

EPF Calculation
EPFO Update: EPFO कडून महत्वाची घोषणा! PF खात्यावर मिळणार मोठं व्याज, कर्मचाऱ्यांना दिलासा

दर महिन्याला थोडी थोडी रक्कम जमा करुन तुम्ही कोट्यवधी रुपये मिळवू शकतात. या खात्यावर तुम्हाला व्याजदरदेखील मिळते. त्यामुळे रिटायरमेंटपर्यंत चांगली रक्कम मिळते. जर ५० हजार रुपये पगार असलेला व्यक्ती अनेक वर्षांसाठी गुंतवणूक करत असेल तर त्याला नक्कीच कोट्यवधी रुपये मिळतील.

केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) सुरु केली आहे.खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची योजना मानली जाते. जर तुम्ही खूप आधीपासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर चांगला परतावा मिळणार आहे.पीएफ खात्यात १२ टक्के कर्मचारी आणि १२ टक्के कंपनीकडून जमा केले जातात.

EPF Calculation
EPFO मध्ये मोठा बदल; आधीच्या बंद झालेल्या PF खात्यातील पैसा येईल थेट तुमच्या बँक खात्यात

कोट्यवधी रुपये मिळवण्याचं कॅल्क्युलेशन

जर तुमचा पगार ५० हजार रुपये असेल तर पीएफ खात्यात चांगले पैसे जमा करु शकतात. पगार वाढल्यावर पीएफ खात्यातील गुंतवणूकदेखील वाढते. जर तुमचा पगार ५०,००० आहे. तुमचा पगार ६ टक्के वाढत असेल तर हळूहळू तुमची पीएफ खात्यातील रक्कम वाढत जाईल.

सध्या पीएफ खात्यावर ८.२५ टक्के व्याज दिले जाते. दरवर्षी हे व्याजदर जमा केले जाते. जर तुम्ही २२व्या वर्षी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली चांगला फंड जमा करु शकतात. सॅलरी वाढण्यासोबतच पीएफची रक्कम वाढू शकेल. वयाच्या २२ वर्षापासून ते ५८ वर्षापर्यंत चांगले पैसे जमा होतील. कर्मचाऱ्यांना ५.५ कोटींपेक्षा जास्त फंड मिळू शकतो.

EPF Calculation
EPFO Update: होळीला ३१ कोटी कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; PF खात्यावरील व्याजदर वाढणार की कमी होणार? आज होणार निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com