

ईपीएफओ खातेधारकांसाठी एक मोठी खुशखबर आहे. आता तुमच्या साठलेल्या ईपीएफ खात्यावर तुम्हाला मोठं व्याज मिळणार असल्याची शक्यता आहे. गेल्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार इक्विटी मार्केट आणि ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यावर चर्चा झाली होती. आता या गुंतवणुकीच्या माध्यमातून जास्त फायदा मिळाला तर कर्मचाऱ्यांना व्यासासोबत जास्तीची रक्कम खात्यात जमा होईल अशी शक्यता आहे.
TIO च्या वृत्तानुसार, बैठकीत एक सरकारी प्रतिनिधी सहभागी झाला होता. त्यानेच समिती स्थापण करण्याची शिफारस केली होती. त्यामुळे घेतला जाणारा प्रत्येक निर्णय कोट्यवधी कुटुंबांवर परिणाम करणारा ठरतो.
आता यामध्ये ४५ ते ६५ टक्के गुंतवणूक ही सरकार सुरक्षा ठेव आणि योजनांमध्ये गुंतवल्या जातो. त्यातला २० ते २५ टक्के निधी कॉर्पोरेट डेट पेपर्समध्ये गुंतवला जातो. त्यातला फक्त ५ टक्के निधी हा कमी कालावधीच्या योजनांमध्ये गुंतवण्यात आला आहे. त्यातुनच इंडेक्स फंड्समध्ये ५ ते १५ टक्के फंड इक्विटीजमध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे. ३१ डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार EPFO ने आपल्या एकूण निधीपैकी सुमारे 88 टक्के रक्कम सरकारी बाँड्समध्ये आणि १०. ६ टक्के रक्कम इक्विटीजमध्ये गुंतवली आहे. मात्र आता ETFच्या पलीकडे जाऊन थेट इक्विटी बाजारात गुंतवणुकीच्या शक्यता तपासल्या जात आहेत.
खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पीएफ ही अनिवार्य बचत योजना आहे. कर्मचारी आपल्या मूळ पगाराच्या १२ टक्के रक्कम जमा करतो. नियोक्त्याच्या योगदानातील ८.३३ टक्के हिस्सा कर्मचारी पेन्शन योजनेत जातो. ईपीएफ खात्यात जमा झालेल्या रकमेवर दरवर्षी व्याज दिले जाते आणि ते सरकार जाहीर करतं.
EPFO आपल्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. येत्या महिन्यात चालू आर्थिक वर्षासाठी नवीन व्याजदर जाहीर केला जाणार आहे. गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेने EPFO ला गुंतवणूक व्यवस्थापन आणि लेखी पद्धतीने सुधारण्याबाबत काही सूचना केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आता जास्त चांगला परतावा देण्यासाठी गुंतवणूक धोरणात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या काळात कोट्यवधी खातेदारांना जास्त व्याजाचा फायदा मिळू शकतो.