Sakshi Sunil Jadhav
अनेक अभिनेत्री त्यांच्या पन्नाशितही तितक्यात तरुण दिसतात, जितक्या २० ते ३० वयात दिसायच्या. पण कसं शक्य आहे? असा महिलांना प्रश्न पडतो.
अभिनेत्री नेहमीच महागड्या ट्रींडमेंट घेतात आणि त्यांचा चेहऱ्या ग्लोइंग ठेवण्याचा प्रयत्न करतात असा अनेकांचा समज चुकीचा आहे.
त्यातच अभिनेत्री भाग्यश्रीने तिच्या फिटनेस आणि नैसर्गिक सौंदर्यांचे गुपित सोशल मीडियावर सांगितले आहे. पुढे आपण याच सिक्रेट आणि काही होम रेमेडीजबद्दल जाणून घेणार आहोत.
अभिनेत्रीने त्वचा आणि फिटनेस साठी एक खास मॅजिक वॉटर जे घरगुती असेल ते पिण्याचा सल्ला दिला आहे.
दालचिनी, लवंग, वेलची, तमालपत्र, पुदीना, चक्रफूल हे साहित्य किंवा मसाले या रेमिडीसाठी पुरेसे आहेत.
काचेच्या बाटलीत किंवा भांड्यात कोमट पाणी घ्या. त्यात दालचिनी, लवंग, पुदिना, वेलची, तमालपत्र आणि चक्रफूल हे सहा घटक टाका. हे मिश्रण किमान ८ तास किंवा रात्रभर भिजत ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा.
दालचिनी आणि लवंग अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. हे घटक शरीराची प्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यास मदत करतात.
पुदिना आणि वेलची शरीराला थंडावा देतात व पचनसंस्था सुधारतात. पचन चांगले राहिल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक दिसू शकते.
तमालपत्र आणि चक्रफूल शरीरातील विषारी द्रव्ये (Toxins) बाहेर टाकण्यास व सूज (Inflammation) कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हे पाणी डिटॉक्स ड्रिंक म्हणूनही ओळखले जाते.
सलग दोन आठवडे नियमित सेवन केल्यास त्वचा आणि ऊर्जेत सकारात्मक बदल जाणवू शकतो, असा दावा केला जातो. मात्र, कोणतीही आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.