EPFO 3.0: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता ATM आणि UPIद्वारे काढता येणार PF; सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

PF Withdraw from ATM And UPI: ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता लवकरच ईपीएफओ 3.0 लाँच होणार आहे. तुम्ही एटीएम किंवा यूपीआयमधून पीएफ काढू शकतात.
EPFO 3.0
EPFO 3.0Saam Tv
Published On
Summary

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

लवकरच ईपीएफओ 3.0 होणार लाँच

एटीएम आणि यूपीआयमधून काढता येणार पैसे

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ईपीएफओ लवकरच EPFO 3.0 सुरु करणार आहे. या नवीन सुविधेअंतर्गत आता पीएफ तुम्हाला एटीएममधून काढता येणार आहे. पीएफ अकाउंट बँक अकाउंटसारखं काम करणार आहे. या नवीन सुविधेमुळे कर्मचाऱ्यांना खूप फायदा होणार आहे. ईपीएफओ 3.0 अंतर्गत आता तुम्ही एटीएम किंवा यूपीआयमधून पैसे काढू शकतात.

EPFO 3.0
EPFO मध्ये मोठा बदल; आधीच्या बंद झालेल्या PF खात्यातील पैसा येईल थेट तुमच्या बँक खात्यात

कोणत्याही कागदपत्राशिवाय काढता येणार पीएफ (PF Withdrawal Without Documents)

सध्या पीएफ काढण्याची प्रोसेस खूप मोठी आहे. तुम्हाला काही कागदपत्र सबमिट करावे लागतात. याचसोबत नियोक्त्याच्या मंजूरीची आवश्यकता असते. मात्र, या नवीन ईपीएफओ 3.0 मुळे सर्वकाही डिजिटल होणार आहे. याद्वारे तुम्ही ऑनलाइन अवघ्या काही मिनिटात पीएफची सर्व कामे करु शकतात. EPFO 3.0 अंतर्गत डिजिटल- कोअर बँकिंग सिस्टीम तयार केली जाणार आहे. यामध्ये तुम्ही पीएफ बॅलेन्स चेक करु शकतात. याचसोबत ऑनलाइन क्लेम करु शकतात.

EPFO 3.0
EPFO च्या नियमांमध्ये मोठे बदल; सरकारनं दिली नवी अपडेट

ATM किंवा UPI द्वारे काढता येणार पैसे (PF Withdraw through ATM And UPI )

आता EPFO 3.0 अंतर्गत पीएफचे पैसे एटीएम किंवा यूपीआयद्वारे काढू शकतात. ही सुविधा मेडिकल, घर खरेदी, शिक्षण, बेरोजगारी अशा विविध कारणांसाठी वापरता येणार आहे. या कारणांसाठी तुम्ही पैसे काढू शकतात.

याचसोबत क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया खूप सोपी होणार आहे. आधार आणि केवायसी व्हेरिफिकेशन ऑटोमेटिक होणार आहे. यामुळे तुम्हाला काही दिवसातच पैसे मिळणार आहे. सध्या ही प्रोसेस खूप लांबलचक आहे. तुम्हाला खूप वेळा अर्ज करावा लागतो.

EPFO 3.0
EPFO Recruitment: १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; EPFO मध्ये भरती; अर्ज कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com