Fact Check : सरकार म्हणतंय, एक वेळ जेवण सोडा? खरंच अमित शाहांनी विधान केलं? VIDEO

fact check : आर्थिक संकटामुळे एका वेळेचे`जेवण सोडा असं आवाहन सरकारने केल्याचा दावा करण्यात आलाय...अमित शाहांच्या नावाने मेसेज व्हायरल होतोय...पण, खरंच असं आवाहन सरकारने केलंय का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात..
fact check news
viral news Saam tv
Published On

एक मोठं संकट येत आहे. आता एक वेळचं जेवण टाळा, असं अमित शाहा बोलल्याचा दावा करण्यात आलाय...अमित शाहांचा फोटो आणि हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय...पण, खरंच असं अमित शाहा बोललेत का...? व्हायरल मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहुयात...

व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं की, 'एक मोठं संकट येत आहे, शक्य असल्यास एक वेळचे जेवण टाळा'.

हा मेसेज व्हायरल होतोय...सध्या देशात इंधन टंचाई सुरू झालीय...त्यातच महागाई प्रचंड वाढतेय...आणि अमित शाहांच्या नावाने मेसेज व्हायरल होत असल्याने संताप व्यक्त केला जातोय...आधीच मोदींनी एक वर्ष सोनं खरेदी करू नका, परदेश प्रवास टाळा, खाद्य तेलाचा जपून वापर करण्याचं आवाहन केलं...त्यामुळे खरंच आता शाहा एक वेळचं जेवण टाळा असं बोललेत का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली..

fact check news
Vidyadhar Joshi: 'सोनं खरेदी करणं म्हणजेच विनोद'; मोदींच्या आवाहनावर प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्ट

अमित शहा असं बोलतानाचा व्हिडिओ आहे का...? याचा आमच्या व्हायरल सत्य टीमने शोध घेतला...तशीच कुठे अशी बातमी आहे का...? याबद्दल माहिती मिळवली...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य काय?

केंद्रीय मंत्री अमित शाहांनी असं विधान केलेले नाही

एका वेळचं जेवण सोडा असं शाहा बोललेले नाहीत

सध्या देशावर आर्थिक संकट असल्याने मेसेज व्हायरल

लोकांची दिशाभूल करण्यासाठी चुकीची पोस्ट

fact check news
भारतात लॉकडाऊन लागणार? इंधन संकटामुळे देश ठप्प होणार?

सध्या सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट व्हायरल केल्या जातात...आणि काही लोक लाईक्स करून शेअर करतात...त्यामुळे पोस्ट शेअर करण्याआधी त्याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...आमच्या पडताळणीत सरकारने आर्थिक संकटामुळे एक वेळचं जेवणं सोडा असं आवाहन केल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com