भारतात लॉकडाऊन लागणार? इंधन संकटामुळे देश ठप्प होणार?

Fact Check: भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याचा व्हायरल दावा खोटा ठरला आहे. देशात पुरेसा इंधन साठा उपलब्ध असून सरकारने लॉकडाऊनबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. जाणून घ्या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य.
Fuel crisis fears spark viral lockdown rumors in India, but fact-check reveals no such government decision.
Fuel crisis fears spark viral lockdown rumors in India, but fact-check reveals no such government decision.saam tv
Published On

होय, आता भारतात कोरोनात जसं लॉकडाऊन लागलं होतं...तसंच लॉकडाऊन लागणार असल्याचा दावा करण्यात आलाय...युद्धाचा फटका भारताला बसत असल्याने इंधन बचत करा, वर्क फ्रॉम होम करा, सोनं खरेदी न करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलंय...त्यामुळे भारतात लॉकडाऊन लागणार का...? असा सवाल उपस्थित केला जातोय...त्यामुळे खरंच आता लॉकडाऊन लागणार आहे का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...

...पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दर प्रचंड वाढणार आणि सामान्यांना ते परवडणार नाही असाही दावा करण्यात आलाय...पण, खरंच इंधन, गॅसचे दर वाढणार का...? गेल्या 10 आठवड्यात 1 लाख कोटींचं पेट्रोलियम कंपन्यांना नुकसान झाल्याची माहिती देण्यात आलीय...त्यामुळे मोदींनींच आता इंधन बचतीचं आवाहन केल्याचा दावा केलाय...सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशात सध्या किती इंधन साठा उपलब्ध आहे याची माहिती घेणं गरजेचं आहे...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने याची पडताळणी सुरू केली...त्यावेळी बैठकीत देण्यात आलेल्या माहिती मिळाली...

देशात इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा नाही

भारताकडे 60 दिवसांचा कच्च्या तेलाचा, नैसर्गिक वायूचा साठा

45 दिवसांचा एलपीजीचा साठा

लॉकडाऊन लावण्याबाबत सरकारने निर्णय घेतलेला नाही

भारतासह अनेक देशात इंधन बचतीसाठी वर्क फ्रॉम होम सुरू

सध्या युद्धामुळे अनेक देशात इंधनाची टंचाई आहे...त्याचा परिणाम सर्वसामान्यांना बसू लागलाय...मात्र, इंधन साठा असूनही वेळेत बचत केली तर भविष्यातील धोका टळू शकतो...त्यामुळे इंधन बचत केली जात असल्याची माहिती मिळतेय...तर सोनं खरेदी न करण्याचं आवाहन हे रुपया स्ट्राँग करण्यासाठी आहे...मात्र, भारतात लॉकडाऊन लावण्याचा विचार सध्या तरी नाही...त्यामुळे आमच्या पडताळणीत देशात लॉकडाऊन लावणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com