
Mumbai Delhi Expressway: मुंबई ते नागपूर या दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग आता देशाची राजधानी दिल्लीशी जोडला जाणार आहे. ४.२ किमी लांब 'आमने ते बडोदा - मुंबई द्रुतगती मार्ग' पूर्ण झाला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस महामार्ग प्रकल्पाचा शेवटचा टप्पा पूर्ण होणार आहे. त्यानंतर दोन ते तीन महिन्यांमध्ये महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या ७०१ किमी लांब महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर वीस तासांवरुन आठ तासांवर आला. हा देशातील सर्वात लांब द्रुतगती महामार्ग आहे. ६२५ किमी लांब हा महामार्ग इगतपुरी-नागपूर-इगतपुरी अशा तीन टप्प्यांमध्ये सुरु आहे. आता हा महामार्ग थेट दिल्लीशी संलग्न होणार आहे. त्याच्या जोडरस्त्याचेही काम पूर्ण झाले आहे.
बडोदा-मुंबई द्रुतगती महामार्ग नव्याने उभारला जात आहे. 'एनएचएआय'च्या मुंबई मुख्यालयांतर्गत सर्व १०३ किमी लांब रस्त्याच्या कामासाठी कंत्राटदार नियुक्त करण्यात आला आहे. रस्त्याच्या बांधकामाला सुरुवातही झाली आहे. जून महिन्यापर्यत बांधकाम पूर्ण होईल असा अधिकाऱ्यांना विश्वास आहे. हा महामार्ग दक्षिणेकडे आमनेनंतर अंबरनाथजवळील भोज आणि तिथून पुढे मोरबेपर्यंत (तळोजाची पूर्व बाजू) तयार केली जाणार आहे. त्यानंतर महामार्ग जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरणापर्यंत (जेएनपीए) नेला जाणार आहे.
समृद्धी महामार्गामुळे राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरांसह १४ जिल्ह्यांमधील दळणवळणाचे प्रमाण वाढत आहे. आता नव्या महामार्गामुळे समृद्धी महामार्ग दिल्लीला जोडला जाईल. ४.२ किमी स्पर रोड बांधण्यात एका गोदामाचा अडथळा आला होता. या गोदामाची जागा बदलण्याचे आल्याने रस्ता पूर्णपणे तयार झाला आहे आणि समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पादेखील पूर्ण झाला आहे. एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.