
Plane book for Yatra: मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांना गावची ओढ कायम असते.विशेषत सणवार किंवा यात्रा आली की हमखास मुंबईकर सुट्टी टाकून गावाकडे धावतो. गणपती आणि शिमग्याला न चुकता जाणारा कोकणी माणूस विरळाच,मात्र गावी जाण्यासाठी अख्खं विमानच बुक केल्याचं तुम्ही कधी ऐकलयं का?? हो असं घडलंय.
मुंबईत राहणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील भादवणच्या ग्रामस्थांनी गावच्या यात्रेला जाण्यासाठी चक्क विमान बुक केल.कोल्हापूर(kolhapur) विमानतळावर दाखल होताच गावकऱ्यांनी महालक्ष्मीचा जयघोष केला.गावच्या यात्रेला विमानाने यायची संकल्पना नेमकी कशी सुचली ते देखील जाणून घेऊयात.
विमान लँड झालं अन् हौशी गावकरी गावातही पोहोचले मुंबईत राहणारी गावाकडची लोक थेट विमानाने आलेत म्हटल्यानंतर गावाकडे देखील जंगी स्वागत झालं.गावाकडं यात्रेला विमानाने जायची हौस फिटल्याची भावना अनेकांच्या चेहऱ्यावर होती.
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ(Video) युटुबवरील 'saamtv' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये चांगलाचा पसंतील आलेला असून नेटकऱ्यांनी कम्माल अशा प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.
टीप : कोल्हापुरमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.