
Cctv Shocking Video: बिबट्या हा प्राणी चालाख शिकाऱ्यांपैकी एक म्हणून त्याची ओळख आहे.एवढचं नाही कर बिबट्याचा एक वार संपूर्ण खेळ खल्लास.सोशल मीडियावर बिबट्याने केलेल्या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ आजवर पाहण्यास मिळाले आहेत.मात्र सध्याचा व्हायरल व्हिडिओ पाहून तुमच्या मनात धडकी भरेल.
निफाड पाठोपाठ नाशिकच्या येवला तालुक्यात देखील बिबट्यांचा वावर आता मोठ्या प्रमाणात वाढला असून तालुक्यातील ठाणगाव येथे सोपान शंकर शेळके यांच्या गीर गाईच्या गोठ्याजवळ एक बिबट्या(leopards) कुत्र्याची शिकार करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची चांगलीच दहशत पसरली असून पिंजरा लावून त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
पुन्हा एकदा नाशिकच्या पाथर्डी-वडनेर रोडवरील बोराडे वस्तीमध्ये बिबट्यांचा वावर वाढलेला असून त्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. सोमनाथ बोराडे यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चक्क तीन बिबटे आढळले. गेल्या तीन-चार दिवसांपासून रात्रीच्या वेळी गावात बिबट्यांचा मुक्त संचार पाहण्यास मिळाला आहे.आज सकाळी मनोहर बोराडे यांच्या शेतात देखील बिबट्या आढळला. बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे गावकरी दहशतीत, शेतीच्या कामांवर परिणाम झालेला असून स्थानिक प्रशासन आणि वनविभागाने त्वरित बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केलेली आहे.
व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ अपलोड करण्यासोबत कॅप्शनमध्ये,''ठाणगाव परिसरात बिबट्याची दहशत! शिकार करतानाचा व्हिडीओ CCTVमध्ये कैद!'',असे कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलेले आहे.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.