Kolhapur Crime : एसबीआयच्या एटीएमवर दरोडा, १८ लाखांची रोकड लंपास, कोल्हापूर पोलीस आणि दरोडेखोरांत थरार

Kolhapur Crime News : कोल्हापूरमध्ये एसबीआयच्या एटीएमवर दरोडा घालण्यात आल्याची घटना घडली आहे. एटीएममधून १८ लाखांची रोकड लंपास झाला आहे. यावेळी कोल्हापूर पोलीस आणि दरोडेखोरांत पाठलागाचा थरार झाला.
एसबीआयच्या एटीएमवर दरोडा, १८ लाखांची रोकड लंपास, कोल्हापूर पोलीस आणि दरोडेखोरांत थरार
Kolhapur Crime :Saam tv
Published On

रणजीत माजगावकर, साम टीव्ही

कोल्हापूर : कोल्हापूरच्या चंदगडमध्ये एटीएममध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे. चंदगड तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम फोडल्याची घटना घडली आहे. या एटीएम फोडून चोरट्याने लाखो रुपयांची रोकड लंपास केली आहे. एटीएम फोडल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील कोवाड स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम फोडलं आहे. चोरट्याने एटीएम फोडून तब्बल 18 लाख 77 हजार 300 रुपयांची रोकड लंपास केली आहे. एटीएमधून लाखोंची रोकड लंपास केल्यानंतर चोरट्यांच्या भरधाव चारचाकीने पोलिसांनी बॅरिगेट लावून केलेली नाकाबंदी उडवली आहे.

एसबीआयच्या एटीएमवर दरोडा, १८ लाखांची रोकड लंपास, कोल्हापूर पोलीस आणि दरोडेखोरांत थरार
Crime News: नवऱ्याचा फोन पाहिला अन् हादराच बसला! पती निघाला समलिंगी, महिला पोलिसाच्या पायाखालची वाळू सरकली

चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी थरारक पाठलाग केला. या पाठलागादरम्यान पोलीस आणि चोरट्यांच्या वाहनांना एकमेकांना जोराची धडक बसली. या धडकेनंतर चोरटे कार सोडून पैसे घेऊन पसार झाले. या प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसबीआयच्या एटीएमवर दरोडा, १८ लाखांची रोकड लंपास, कोल्हापूर पोलीस आणि दरोडेखोरांत थरार
Crime News: पत्नीचं अफेअर, बॉयफ्रेंडला लपून छपून भेटायची; नवऱ्याला कळताच दोघांचा काटा काढला

चंदगडच्या कोवाडमध्ये एटीएममधील लाखो रुपये लंपास करणारे चोरटे राजस्थानचे असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. यामुळे कोल्हापूर पोलिसांच्या क्राईम ब्रँच पथक चोरट्यांच्या शोधासाठी रवाना झालं आहे. या चोरीच्या घटनेनेमुळे परिसरात एकच भीती निर्माण झाली आहे. या चोरीच्या घटनेमुळे चंदगडमधील नागरिकांकडून सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एसबीआयच्या एटीएमवर दरोडा, १८ लाखांची रोकड लंपास, कोल्हापूर पोलीस आणि दरोडेखोरांत थरार
Crime News : जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद; महिलेसह चौघांना अटक, मावळमधून तीन बांगलादेशी ताब्यात

मध्यरात्री दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये थरारक पाठलाग

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कोवाड येथे दरोड्याची घटना घडली आहे. कोवाडमधील एसबीआयच्या एटीएमवर दरोडा घालण्यात आला. त्यानंतर चोरट्यांनी मध्यरात्री 18 लाख रुपयांची रोकड दरोडेखोरांनी पळवली. या घटनेनंतर चोरटे राजस्थानमधील असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर मध्यरात्री दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये थरारक पाठलाग झाला. दरोडेखोरांच्या शोधासाठी चंदगड पोलिसांची पथके रवाना झाल्याची माहिती हाती आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com