Mumbai Police: मोबाईल स्नॅचिंग टोळीला पोलिसांचा दणका, ९ लाख रुपये किंमतीचे चोरीचे फोन केले जप्त

Andheri Police Arrest Mobile Snatchers: अंधेरी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये चोरींकडून तब्बल १२० मोबाईल मिळाले आहेत. या मोबाईल फोन्सची किंमत अंदाजे ९,१८,३००/- रूपये इतकी आहे.
andheri police arrest mobile snatchers
andheri police arrest mobile snatchersSaam Tv
Published On

संजय गडदे (साम टीव्ही)

Mumbai : मागील काही दिवसांपासून मुंबईत मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लोकांचे फोन लंपास करणाऱ्या सराईत मोबाईल चोरांना आणि चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्या तिघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी १२० मोबाईल हस्तगत केले आहेत. पोलिसांनी आरोपींना अंधेरी महादंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सूनावण्यात आली आहे. दरम्यान आरोपींनी अन्य गुन्हे केले आहेत का याचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबर रोजी अंधेरी पोलीस स्थानकासमोरच्या प्रसादम हॉटेलजवळ फोनवर बोलत असणाऱ्या व्यक्तीचा फोन दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी पळवला. यासंदर्भात अंधेरी पोलीस स्थानकात मोबाईल चोरीचा तक्रार करण्यात आली. तक्रारीवरुन कलम ३०९ (२) (४), ३ (५) बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आणि पोलिसांनी लगेच तपासाला सुरुवात केली.

पोलीस स्थानक परिसरात सातत्याने मोबाईल चोरीच्या घटना होत असल्याने गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक किशोर परकाळे यांच्यासह त्यांच्या पथकाकडे सोपवण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी प्रसाद गुरव आणि विकेश उपाध्याय या दोघांना अटक केली. त्यानंतर आरोपींनी मोबाईल रवी वाघेला या व्यक्तीला दिल्याचे कबूल केले. पोलिसांनी लगेच रवी वाघेलाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे चोरी झालेल्या मोबाईलसह एकूण १२० मोबाईल हस्तगत केले. या मालमत्तेची एकूण किंमत ९,१८,३००/- रूपये इतकी आहे.

andheri police arrest mobile snatchers
Nashik News : धक्कादायक! पाच दिवसांचे नवजात बाळ चोरले; नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील प्रकार, पाहा Video

ही यशस्वी कामगिरी पोलीस उपआयुक्त सचिन गुंजाळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त, डॉ. शशिकांत भोसले,यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश भामे, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किशोर परकाळे यांच्या पथकाने पार पाडली.

andheri police arrest mobile snatchers
Surat News : ऑन ड्युटी CISF जवान किसनसिंग बाथरुममध्ये गेला अन्..., पुढे जे घडलं ते पाहून विमानतळावरील सगळेच हादरले!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com