
Surat News : सूरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली आहे. विमानतळावर तैनात सीआयएसएफ जवानाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या जवानाने संरक्षणासाठी देण्यात आलेल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे.
पोलिसांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या सीआयएसएफ जवानाचे नाव किसनसिंग कंवर असे आहे. त्याने आज (४ जानेवारी) दुपारी दोनच्या सुमारास पोटात गोळी घालून आत्महत्या केली. आत्महत्येसंबंधित माहिती मिळताच किसनसिंगला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, किसनसिंग कंवर दुपारी १ वाजता विमानतळाच्या डी-१ गेटवर ड्युटीसाठी पोहोचला होता. ड्युटी सुरु करण्यापूर्वी तो विमानतळाच्या बाथरुममध्ये गेला. त्याने एका सहकाऱ्याला बाथरुमला जात असून काही वेळेसाठी गेटवर उभे राहण्यास सांगितले. बराच वेळ झाला तरीही किसनसिंग परत न आल्याने सहकारी बाथरुमजवळ पोहोचला. त्याने किसनसिंगला बाहेर येण्यासाठी आवाज दिला. पुढे प्रतिसाद न आल्याने अधिकाऱ्यांना संपर्क केला.
बराच वेळ बाथरुममध्ये थांबलेल्या किसनसिंगला बोलवण्यासाठी त्याचा सहकारी पोहोचला. आवाजाला प्रतिसाद न दिल्याने त्याने अधिकाऱ्यांना सूचना दिली. बाथरुममध्ये गेल्यावर अधिकाऱ्यांना किसनसिंग कंवर जमिनीवर मृतावस्थेत पडलेला दिसला. त्याने स्वत:च्या पोटात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली. त्याच्या या कृत्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही, अशी माहिती डुमास पोलीस ठाण्याचे निरीक्षक एनव्ही भारवाड यांनी सांगितले.
किसनसिंग कंवरचे कुटुंब जयपूरला असते. झालेल्या प्रकाराची कल्पना आम्ही त्याच्या कुटुंबियांना दिली आहे. आत्महत्येबद्दल अधिक तपशील मिळवण्यासाठी सीआयएसएफ अधिकाऱ्यांनी समन्वय साधत आहेत असेही भारवाड यांनी सांगितले. किसनसिंग २०१५ पासून सीआयएसएफमध्ये होता. २०२२ मध्ये त्याची सूरतला नियुक्ती झाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.