
Dance Video: सोशल मीडियावर अनेकदा गावाकडील शाळांमधील बरेच अनोखे व्हिडिओ व्हायरल होतात.त्यातील काही व्हिडिओमध्ये शिक्षकांची शिकवण्याची अनोखी पद्धत पाहण्यास मिळते तर कधी विद्यार्थ्यांच्या अनोख्या कला सादर होताना पाहण्यासाठी मिळतात.सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओही एका गावाकडील शाळेतील आहे.ज्यात गावाकडील शाळेच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये जे काही घडलं ते व्हायरल होत आहे.
शाळा(School) कोणतीही असो आणि त्या शाळेतील शिक्षक मुलांना शिकवण्यासाठी खूप कष्ट घेत असतात.अभ्यासाबरोबरच मुलांना समाजील अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकवत असतात.सध्याचा व्हायरल व्हिडिओ एका गावाकडील शाळेतील आहे,ज्यात शिक्षकांनी मुलांना जे काही शिकवले आहे ते पाहून प्रत्येकजण त्यांचे कौतुक करत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला गावाकडील एक सुंदर शाळा दिसत आहे.पुढे व्हिडिओत पाहिले तर एक शिक्षक विद्यार्थ्यांसोबत शाळेच्या मैदानात आहेत.त्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थी डान्स करत आहेत ते ही आम्ही गड्या डोंगरचं राहणारं या गाण्यावर.सर्वांचा डान्स करताना उत्साह अतिशय जबरदस्त आहे.डान्स करत असताना शिक्षक आणि विद्यार्थी कोलांट्या उड्याही मारत आहेत.सध्या सर्व व्हिडिओ चांगलाच पसंतीस येत आहे.
सर्व व्हिडिओ gavthi2.0 या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आलेा आहे. व्हिडिओ (Video)अपलोड केल्यानंतर काही दिवसात तब्बल तीन लाखांहून अधिक व्ह्युज आणि लाखोंच्या घरात व्हिडिओला पसंती मिळालेली आहे.एवढेच नाही तर बऱ्याच प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेट केली आहे,''गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी'' तर दुसऱ्या एका कमेट केली आहे,''खूप छान सर कौतुक किती करावं'',अशा कौतुकास्पद प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.