School Fee : शाळा आहे की बिझनेस? तिसरीच्या मुलाची फी तब्बल २.१० लाख रूपये, पालकांचा संताप

Bengaluru news : तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलाची फी तब्बल २.१ लाख रूपये इतकी आहे. बंगळुरूमधील शाळेचा पराक्रम सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
School Fee News
School Fee News
Published On

School Fee News : अव्वाच्या सव्वा 'फी' घेणाऱ्या शाळेबाबत पालकांमध्ये नेहमीच संताप असतो. गेल्या काही वर्षांमध्ये शाळेची फी अव्वाच्या सव्वा झाल्यामुळे नागरिक आणि पालक त्रस्त आहेत. त्यातच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होतेय, त्यामध्ये तिसरीत शिकणाऱ्या मुलाची फी तब्बल २.१० लाख रूपये असल्याचं दिसतेय. व्हाइस ऑफ पेरेंट्स असोशिएशनने ही पोस्ट केली आहे, त्यामध्ये कोण कोणत्या प्रकारची फी आकारली जाते, ते दिसतेय. १.९ लाख रूपये ट्युशन फी दिसत आहे. ९ हजार रूपये वार्षिक शुल्क आणि ११,४४९ रूपये इंप्रेस्ट ठेवण्यात आली आहे.

सोशल माडियावर पालकांचा संताप -

व्हाइस ऑफ पेरेंट्स असोशिएशन पोस्ट करताना कॅप्शनमध्ये वास्तव पोस्ट केलेय. बंगळुरूमध्ये तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची वार्षिक फी दोन लाख १० हजार रूपये इतकी आहे. कोणतीही महागाई याला योग्य ठरवू शकत नाही. सरकार अभियांत्रिकी महाविद्यालयाची फी नियंत्रित करते, परंतु शाळेच्या फीचा मुद्दा टाळत आहे. शाळेचा व्यवसायासारखा कोणताही व्यवसाय नाही, असे पोस्ट मध्ये म्हटलेय. यानंतर सोशल मीडियावर पालकांचा संताप दिसून आला.

शाळा आहे की बिझनेस?

व्हाइस ऑफ पेरेंट्स असोसिएशनने खासगी शाळांवर गंभीर आरोप केलेत. खासगी शाळांनी शिक्षणाचा व्यवसाय सुरू केल्याचा आरोप कऱण्यात आलाय. अनुच्छेद 29, 30 आणि 19(1)(g) नुसार शाळांना संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे, परंतु याचा अर्थ त्यांनी नफा कमवावा असा नाही, असे म्हटलेय. पळवाटा न ठेवता सरकारने कठोर नियम लागू केले पाहिजेत, असे म्हटलेय.

कोणतीही शाळा नियमांचे पालन करत नाही. भ्रष्टाचारामुळे शाळांवर व्यवस्थित देखरेख केली जात आहे. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि प्रभावी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे, असे असोशिएशनने म्हटलेय.

सोशल मीडियावर काय काय सुरू आहे?

बंगळुरूमधील खासगी शाळेच्या फीचा चार्ट व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. अनेक पालकांनी आपाल राग व्यक्त करताना सरकारवरही टीका केली. एका यूजरने म्हटले की, 'चांगल्या पायाभूत सुविधांसह शाळा चालवणे महाग आहे, पण अव्वाच्या सव्वा फी घेणं हा त्यावरचा उपाय नाही.' "जेव्हा समाजातील विशेषाधिकारित लोक सरकारी शाळा निवडतात तेव्हा त्यांची पातळी आपोआप सुधारेल, असे दुसऱ्या युजर्सने म्हटलेय."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com