Viral Video : मळलेले कपडे, वाढलेली दाढी अन् केस; मुंबईच्या रस्त्यांवर असा का फिरतोय बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता?

Aamir Khan Caveman Look : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये आमिर खान केव्हमॅनच्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे.
Aamir Khan Caveman Look
Viral VideoSAAM TV
Published On

खूप दिवसापासून सोशल मीडियावर मुंबईच्या रस्त्यांवर एक केव्हमॅन फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल होत होता. हा व्हिडीओ अंधेरी भागातील होता. यामुळे सोशल मीडियावर हा केव्हमॅन कोण अशा चर्चा रंगलेली पाहायला मिळत होती. केव्हमॅन हा बॉलिवूडचा अभिनेता आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू असताना आता केव्हमॅनचा चेहरा समोर आला आहे. हा केव्हमॅन दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) कायमच आपल्या अभिनयासाठी चर्चेत राहिला आहे. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. तसेच वेगवेगळ्या भूमिका देखील केल्या आहेत. आता त्याच्या केव्हमॅनचा लूक करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. सध्या आमिर खानचा एक लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आमिर खान केव्हमॅनच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता आमिर खानने केव्हमॅनचा लूक दर्शील सफारी असलेल्या ब्रँडच्या जाहिरातीसाठी असल्याचे दिसून आले. आमिर खानच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेकजण त्याच्या नवीन प्रोजेक्ट विषयी जाणून घेण्यास आतुर आहेत. आमिर खानचा हा लूक मंगळवारी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओत आमिर खानची एक झलक पाहायला मिळत आहे.

केव्हमॅन लूक

अभिनेता आमिर खान केव्हमॅनच्या भूमिकेत खूप वेगळा दिसत आहे. तो ओळखण्यातही येत नाही आहे. त्याने ब्राऊन रंगाचे वस्त्र परिधान केले आहेत. जशी गुहेत राहणारी माणूस दिसतो असा अगदी खरा वाटणारा लूक आमिर खानने केला आहे. मोठी दाढी आणि मोठे केस व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत. तसेच धूळ लागल्यासारखा चेहरा व्हिडीओमध्ये दिसत आहे.

आमिर खान आणि दर्शीलची जोडी यावेळी काय धुमाकूळ घालणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. या आधी ही जोडी 'तारे जमीन पर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आमिर खानचे पीके, दंगल, ३ इडियट्स आणि तारे जमीन पर हे चित्रपट खूप गाजले आहेत. आमिर खान वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. आमिर खान चित्रपटासोबतच अनेक ब्रँडसोबत कनेक्ट आहे. आमिर खानच्या आगामी प्रोजेक्टसाठी चाहते आतुर असल्याचे पाहायला मिळत आहे.

Aamir Khan Caveman Look
Sikandar : 'सिकंदर'च्या सेटवरून पुन्हा व्हिडीओ लीक, नेमकं व्हायरल VIDEO मध्ये आहे तरी काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com