Fact Check : 50 जागांसाठी 5000 इंजिनीअर्स रांगेत? नोकरीसाठी पुण्यात बेरोजगारांची गर्दी? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Viral Video Fact Check : 50 पदांसाठी भरती होती. जाहिरातच तशी देण्यात आली. मात्र, बघता बघता 5 हजार जण जमा झाले. मात्र, खरंच आयटी इंजिनीयर्स नोकरीसाठी रांगेत उभे होते का.? त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.
Fact check video
Fact check videoSaam Tv (Youtube)
Published On

Fact Check : नोकरी मिळवण्यासाठी ही तुफान गर्दी उसळलीय. शंभर, दीडसे नव्हे तर 5 हजार तरुण-तरुणी या रांगेत उभे आहेत. हे सगळेच आयटी इंजिनीअर्स असून, नोकरीसाठी रांगेत उभे असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र, खरंच एवढी बेरोजगारी निर्माण झालीय का ? एवढ्या तरुण-तरुणींना नोकऱ्या उपलब्ध नाहीत का.? असे अनेक सवाल उपस्थित होतायत. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.

हा मेसेज आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पुण्यातील असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र, खरंच हे आयटी इंजिनीअर्स आहेत का? ही कुठली कंपनी आहे त्या कंपनीत नोकरी करण्यासाठी इच्छुकांच्या रांगा लागल्यायत. हे तपासण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली. हा व्हिडिओ पुण्यातील मगरपट्टामधील असल्याचं समोर आलं. त्यामुळे आमच्या प्रतिनिधींनी थेट मगरपट्टा सीटीच्या प्रमुखांशी थेट संपर्क साधला.

Fact check video
Dhananjay Munde : मुंडेंची 'खंडणी कंपनी', तिरोडकरांची उच्च न्यायालयात याचिका, धनंजय मुंडेंचा पाय खोलात?

आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

- युनायटेड पार्सल सर्व्हिसेस ही आयटी कंपनी नाही

- लॉजिस्टीक आणि बॅकेंड सर्व्हिस प्रोव्हाईड कंपनी

- अमेरिकन कंपनी असून कंपन्यांना बॅकेंड सर्व्हिस प्रोव्हाईड

- डेटा एन्ट्री, कस्टमर सपोर्ट, टेलिकॉलिंग पदं भरली जातात

- बॅक ऑफिससाठी 50 जागा होत्या तिथे इंजिनीअर्सही आले होते

- 5 हजार आयटी इंजिनीअर्स नव्हते, दीड हजार जण होते

Fact check video
Maha Kumbh 2025 : महाकुंभमेळ्यात 30 भाविकांचा मृत्यू, अमृतस्नानाचा हट्ट बेतला जीवावर; VIDEO

आयटी पार्कमधील कंपन्या नेहमीच वॉक इन इंटरव्ह्यूसाठी जाहिरात देत असतात. त्यामुळं उमेदवारांची पात्रता आधी तपासली जात नाही. परिणामी योग्य शैक्षणिक पात्रता नसलेले ही उमेदवार थेट मुलाखतीसाठी येतात. आमच्या पडताळणीत 5 हजार आयटी इंजिनीअर्स रांगेत उभे असल्याचा दावा असत्य ठरला. मात्र, हे आयटी इंजिनीअर्स नसले तरी देशात बेरोजगारांची संख्य़ा वाढतेय हे भयान वास्तव यातून समोर आलंय.

Fact check video
Pune GBS News : पुणे शहरात जी बी एसचा पहिला बळी, ५६ वर्षांच्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com