Dhananjay Munde : मुंडेंची 'खंडणी कंपनी', तिरोडकरांची उच्च न्यायालयात याचिका, धनंजय मुंडेंचा पाय खोलात?

Dhananjay Munde News : धनंजय मुंडेंच्या बेनामी कंपन्यांत खंडणीच्या रकमा आल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. कुणी ही याचिका केलीय? या याचिकेत काय आरोप आहेत? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Dhananjay munde
Dhananjay mundeSakal
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

सरपंच हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचे नवनवे कारनामे समोर येत आहेत.. त्यातच आता कराडबरोबरच धनंजय मुंडेंविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. धनंजय मुंडेंच्या बेनामी कंपन्यांमध्ये खंडणीच्या रकमा वळवल्याचा आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकरांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. या याचिकेत नेमकं काय आरोप करण्यात आले आहेत? पाहूयात.

मुंडेंच्या कंपनीत खंडणीचा पैसा?

- मुंडे आणि कराड खासगी कंपनीत सहसंचालक

- मुंडे संचालक असलेल्या व्यंकटेश्वर इंडस्ट्रियलमधून कराडने आवादा कंपनीला खंडणी मागितल्याचा आरोप

- जगमित्र साखर कारखान्यात कराड, मुंडे संचालक तर कंपनीच्या कार्यालयासाठी मुंडेंच्या नावावर जागा खरेदी

- व्यंकटेश्वर इंडस्ट्रियलचे 20 सप्टेंबर 2022 मध्ये घनवट यांना 40 लाख शेअर्स 4 कोटींना विकले

- राजेश घनवट हे मुंडेंचे निकटवर्तीय आणि कंपनीचे सहसंचालक

- ही रक्कम खंडणीतून उभी केल्याचा आरोप

- मुंडेंच्या बेनामी कंपन्यातून मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप

- तपास मुंडेंपर्यंत येताच पुढे सरकत नसल्याचा आरोप

- एसआयटीने खोलवर तपास केल्यास मकोकांतर्गत शिक्षेची शक्यता

Dhananjay munde
Pune GBS News : पुणे शहरात जी बी एसचा पहिला बळी, ५६ वर्षांच्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत तिरोडकरांनी निवडणूक आयोग, एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली, ईडी आणि बीडचे पोलीस अधीक्षक यांना प्रतिवादी केलं आहे. एवढंच नाही तर मुंडेंच्या बेनामी कंपन्यात खंडणीच्या रकमा वळत्या केल्याने धनंजय मुंडेंची ईडीमार्फत चौकशी करण्याची. तसंच उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत सरपंच हत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आलीय. त्यामुळे आता उच्च न्यायालयाच्या सुनावणीत धनंजय मुंडे गोत्यात येणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

Dhananjay munde
MHADA Housing Scheme 2025 : 'म्हाडा'च्या माध्यमातून दोन वर्षात सुमारे एक लाख घरे उभारणार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com